22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeअंतरराष्ट्रीयमालदीवला मोठा झटका; ट्रॅव्हल कंपन्यांचे बुकिंग स्थगित

मालदीवला मोठा झटका; ट्रॅव्हल कंपन्यांचे बुकिंग स्थगित

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर मालदीववरील भारताचा संताप कमी होण्याचे नाव घेत नाही. या प्रकरणी सोशल मीडियावर युजर्स खूपच भडकल्याचे पाहायला मिळाले, यानंतर आता बड्या ट्रॅव्हल कंपन्यांनी देखील या प्रकरणात बाजू घेण्यास सुरुवात केली आहे. ईज माय ट्रिप या ट्रॅव्हल कंपनीने मालदीवला मोठा झटका दिला आहे.

देशातील सर्वात मोठी ट्रॅव्हल कंपनी ईज माय ट्रिपने मालदीवला जाणा-या सर्व फ्लाइट बुकिंग रद्द केल्या. कंपनीचे सहसंस्थापक आणि सीईओ निशांत पिट्टी यांनी स्वत: सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. निशांत पिट्टी यांनी म्हटले आहे की, देशाच्या एकात्मतेशी निगडीत मालदीवच्या सर्व फ्लाइट बुकिंग स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

या सर्व प्रकरणाची सुरूवात नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौ-यानंतर झाली. पीएम मोदींनी लक्षद्वीपचा दौरा केल्यानंतर तेथील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. यानंतर त्यांनी भारतीयांना येथे पर्यटनासाठी येण्याचे आवाहन देखील केले, यानंतर मालदीवच्या मंत्री मरियम शिउना यांनी पीएम मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह टीप्पणी केली होती. या ट्वीटनंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली होती, त्यानंतर त्यानी ती पोस्ट डिलीट केली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR