23.9 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रवांद्रे-वरळी सागरी सेतूवरून प्रवास महागणार

वांद्रे-वरळी सागरी सेतूवरून प्रवास महागणार

मुंबई : शहरामधील महत्त्वाचा रस्ता ठरलेल्या वांद्रे-वरळी सागरी मार्गावरून जाताना आता जादा टोल द्यावा लागणार आहे. अरबी समुद्रावर बांधण्यात आलेल्या या पुलामुळे मुंबईच्या वांद्रे उपनगराला दक्षिण मुंबईच्या वरळीसोबत जोडले जाते.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने विकसित केलेला हा पूल हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीने बांधला आहे. आता वांद्रे-वरळी राजीव गांधी सागरी सेतूवरून प्रवास करणा-या वाहनचालकांच्या खिशाला १ एप्रिलपासून कात्री लागणार आहे. या ठिकाणी टोलमध्ये वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) घेतला आहे. पुलावरील पथकरात १५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पथकरात १५ रुपयांची वाढ केली आहे. सागरी सेतूवरून जाणा-या कारचालकांना १०० रुपये मोजावे लागणार आहेत. तर वांद्रे-वरळी सागरी सेतूवरून प्रवास करणा-या मिनी बस किंवा तत्सम वाहनांना आता १६० रुपये पथकर भरावा लागणार आहे. तसेच ट्रक आणि बसला २१० रुपये पथकर द्यावा लागेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR