28.7 C
Latur
Monday, June 17, 2024
Homeमहाराष्ट्रकेळझर येथे ट्रॅव्हल्स-बसचा अपघात, २० जखमी तर तिघांची प्रकृती गंभीर

केळझर येथे ट्रॅव्हल्स-बसचा अपघात, २० जखमी तर तिघांची प्रकृती गंभीर

वर्धा : वर्ध्यातील केळझर येथे ट्रॅव्हल्स आणि बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात २० प्रवासी जखमी झाले आहेत, तर तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. केळझर येथील शहीद चौकात ही घटना घडली आहे. तीन प्रवाशांची प्रकृती गंभीर असून सध्या जखमींना सेलू, सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. सेलू पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, ट्रॅव्हल्स चालकाला डुलकी लागल्याने किंवा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे. ट्रॅव्हल्सने एसटी बसला धडक दिली आहे. समोरासमोर धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. यात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत.

सेलू येथील बृहस्पती मंदिरातून आजनसरा येथे प्रवासी घेऊन ट्रॅव्हल निघाली होती, दरम्यान, केळझर येथील शहीद चौकाजवळ ट्रॅव्हल्स येताच चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरून येणा-या एसटीला भरधाव खाजगी बसने धडक दिली. या ट्रॅव्हल्सचा वेग अधिक असल्याने या अपघातात एसटी बसचे प्रचंड नुकसान झाले आहे. ट्रॅव्हल्समधील सर्व हे टाकळघाट येथील असल्याची माहिती समोर आली आहे. या बसमधील १६ प्रवासी तर एसटी बसमधील चालकासह चार प्रवासी जखमी झाले आहेत. यामध्ये तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींमध्ये चार लहान मुलांचा समावेश आहे.

तीन प्रवाशांची प्रकृती चिंताजनक
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवले आहे. मात्र, यात तीन प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचेही बोलले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR