पूर्णा : तालुक्यातील कात्नेश्वर येथे ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने स्त्री शक्ती सन्मान सोहळा व महिला मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात कात्नेश्वरचे नाव उज्वल करणाºया महिला व मुलींचा ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश कात्नेश्वरचे नाव उज्ज्वल करणाºया महिला/मुलींचा यथोचित सन्मान करून त्यांच्या कर्तृत्वाची ओळख होऊन उपस्थित महिलांना त्यांच्याकडून प्रेरणा मिळावी हा होता. यावेळी उपस्थित सर्वांनी उत्कृष्टपणे स्वत:चा परिचय करून देत आपली मनोगते व्यक्त केली. महिलांचे आरोग्य व बालकांच्या विकासातील त्यांची भुमिका यावर चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमास १०० पेक्षा जास्त महिलांनी उपस्थिती नोंदवली.
आज झालेल्या कार्यक्रमात प्रतिभा चापके, पल्लवी संघई, सुनिता हजारे, शितल मोरे यांचा सत्कार करण्यात आला. यशस्वीतेसाठी कात्नेश्वरच्या सरपंच कान्होपात्रा प्रदीप चापके यांच्यासह शिक्षका भाग्यश्री अंबटवार, राधिका गुडेवार व शाळेतील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.