31.2 C
Latur
Thursday, March 13, 2025
Homeसोलापूरस्वामी विवेकानंद प्रशालाद्वारे तिरंगा अभियान

स्वामी विवेकानंद प्रशालाद्वारे तिरंगा अभियान

सोलापूर : नॅब संचलित स्वामी विवेकानंद प्रशाला एमआयडीसी सोलापूर व सोनूसूद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशालेत तिरंगा अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. सीमा यलगुलवार व सोनू सूद फाऊंडेशनचे विपुल मिरजकर ( चित्रकार ), अमोल धडके, शुभम सब्बन, हरिप्रसाद आडकी, अजय मद्धली उपस्थित होते.

प्रशालेतील सर्व सर्व विद्यार्थ्यांना रांगेत उभे करून विद्यार्थ्यांना केसरी, पांढरा, हिरवा या रंगाचे कार्डशिट देण्यात आले तसेच मध्यभागी अशोकचक्र धरून ड्रोन कॅमे-याच्याच्या माध्यमातून तिरंग्याचे फोटो शूट करण्यात आले. या फोटोशूट द्वारे तिरंग्याचे अप्रतिम असे फोटो व व्हीडीओ घेण्यात आले. या प्रसंगी प्रशालेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR