27.5 C
Latur
Wednesday, October 23, 2024
Homeमहाराष्ट्रराष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात मंत्रिपदावरून रस्सीखेच

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात मंत्रिपदावरून रस्सीखेच

मुंबई : प्रतिनिधी
अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून मोदींच्या कॅबिनेटमध्ये मंत्री कोण होणार, पत्नी सुनेत्रा पवार यांना मागच्या दारानं संसदेत एन्ट्री मिळवून दिल्यानंतर अजित पवार मंत्रिपद घरातच ठेवणार की निष्ठावान नेत्याला देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मंत्री बनण्याासाठी सुनेत्रा पवार उत्सुक आहेत. मात्र, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी मीच मंत्री होणार असा विश्वास व्यक्त केला आहे तर केंद्रात मंत्रिपद मिळाल्े तर काम करायला आवडेल, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या. यावरून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत मंत्रिपदावरून रस्सीखेच झाल्याचे पाहायला मिळत आहे.

राष्ट्रवादीला ९ जूनलाच मोदींच्या शपथविधी सोहळ््यात अजितदादांच्या राष्ट्रवादीला राज्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची ऑफर देण्यात आली होती. मात्र, उशिरा द्या, मात्र कॅबिनेटच द्या, या भूमिकेवर अजित पवारांची राष्ट्रवादी ठाम राहिली. त्यामुळे अजितदादांच्या एका शिलेदाराचा राज्याभिषेक होता होता राहिला. लोकसभेतल्या सुमार कामगिरीनंतर अजित पवारांसोबतचे अनेक नेते संपर्कात असल्याचा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घेण्यात आले. त्यामुळे सुनेत्रा पवार यांना राज्यमंत्रिपद देण्यात येईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या कोट्यात कॅबिनेट मंत्रिपद आले तर ते मलाच मिळणार, असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे. योग्य वेळ आल्यावर योग्य निर्णय होईल, असेही पटेल म्हणाले.

राष्ट्रवादीला हव्यात ८० ते ९० जागा
राज्यातील लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीला मोठा फटका बसला. त्यात सर्वात कमी जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांची घोर निराशा झाली. तरीही पराभवाने खचायचे नसते, आता विधानसभेच्या तयारीला लागा, अशा सूचना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या. त्यात राष्ट्रवादीने ८० जागांवर दावा केला आहे. प्रथम मंत्री छगन भुजबळ यांनी पक्षाच्या मेळाव्यातून तसा दावा केला होता. आता प्रफुल्ल पटेल यांनीही ८० ते ९० जागांवर दावा केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR