27.6 C
Latur
Monday, April 22, 2024
Homeमनोरंजनटीव्ही अभिनेता ऋतुराज सिंह यांचे निधन

टीव्ही अभिनेता ऋतुराज सिंह यांचे निधन

मुंबई : अभिनेता ऋतुराज सिंग यांच वयाच्या ५९ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले आहे. सोमवारी रात्री १२.३० वाजता ऋतुराज सिंग यांनी अखेरचा श्वास घेतला असे सांगण्यात येत आहे. ऋतुराज सिंग यांनी निधनाच्या वृत्ताने मनोरंजन क्षेत्रामध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला असून, अनेक लिब्रिटी आणि चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त दु:ख व्यक्त करताना दिसत आहेत.

ऋतुराज सिंग यांनी १९९३ मध्ये छोट्या पडद्यावरून आपल्या अभिनयाची सुरूवात केली होती. त्यांनी अनेक लोकप्रिय मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. ऋतुराज सिंग यांचं संपूर्ण नाव ऋतुराज सिंग चंद्रावत सिसोदिया असं आहे.

ऋतुराज सिंग यांचा जन्म कोटा, राजस्थान याठिकाणी झाला होता. ऋतुराज सिंग यांनी अपनी बात, ज्योति, हिटलर दीदी, शपथ, वॉरियर हाय, आहट और अदालत, दीया और बाती हम यांसारख्या अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. दरम्यान, ऋतुराज सिंग यांच्या निधनाने मनोरंजन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR