27.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रबदलापूरच्या नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर अत्याचार

बदलापूरच्या नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर अत्याचार

मुंबई : प्रतिनिधी
महिला डॉक्टरचा अमानुष छळ करून तिची हत्या केल्याची कोलकातामधील घटना ताजी असताना मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या बदलापूरमधील नामांकित शाळेतील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

बदलापूरच्या या नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. अत्याचारपीडित चिमुरड्या अवघ्या साडेतीन ते चार वर्षांच्या आहेत. धक्कादायक अशा या प्रकारानंतर, सर्वत्र संतापाची लाट असून पालक रस्त्यावर उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर ‘बदलापूर बंद’ची हाक देण्यात आली आहे.

बदलापूरच्या एका नामांकित शाळेतील शिशुवर्गात शिकणा-या दोन मुलींवरील अत्याचारानंतर संतप्त पालकांचे आंदोलन लक्षात घेता प्रशासनातर्फे कारवाईला सुरुवात झाली आहे. या प्रकरणी आरोपी अटकेत असला तरी या प्रकरणी बेजबाबदारपणा दाखवणा-या एका वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची तात्काळ बदली करण्यात आली आहे. तर दुसरीकडे शाळा प्रशासनाने देखील मुख्याध्यापिका, शिक्षिका आणि मुलांची ने-आण करण्याची जबाबदारी असणा-या सेविकांचे निलंबन केले आहे.

बदलापूर शहरातील एका जुन्या आणि नामांकित शाळेत कंत्राटी सफाई कामगाराने साडेतीन वर्षांच्या दोन चिमुकलींचे शारीरिक शोषण केल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणात अखेर ४ दिवसांनी शाळा प्रशासनाने आपली बाजू मांडत शाळेच्या मुख्याध्यापिकांना निलंबित, तर वर्गशिक्षिका आणि आया यांना थेट नोकरीवरून काढून टाकले आहे. तर आरोपी कंत्राटी सफाई कामगार ज्या कंत्राटदारामार्फत शाळेत काम करत होता. त्या कंत्राटदाराचा करारही शाळेने रद्द केला आणि सर्व पालकवर्गाची शाळेने जाहीर माफी मागितली आहे.

पालक तब्बल १२ तास ताटकळत
अत्याचाराचा हा प्रकार लक्षाता येताच पालकांनी तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस ठाणे गाठले. मात्र या ठिकाणी मुलींच्या पालकांची तात्काळ तक्रार न घेता त्यांना तब्बल १२ तास ताटकळत ठेवण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हस्तक्षेपानंतर रात्री एक वाजता पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR