27.6 C
Latur
Monday, April 22, 2024
Homeलातूरलातुरात सोमवारपासून दोन दिवसीय ग्रंथोत्सव 

लातुरात सोमवारपासून दोन दिवसीय ग्रंथोत्सव 

लातूर : प्रतिनिधी
उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने लातूरच्या दयानंद सभागृहात सोमवार, दि. ४ व दि. ५ मार्च रोजी लातूर ग्रंथोत्सव २०२३ चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय मस्के यांनी दिली.
या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सोमवारी सकाळी ११ वाजता होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे हे राहणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार सुधाकर शृंगारे, खासदार ओमराजे निंबाळकर, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, आमदार रमेश कराड, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार धीरज विलासराव देशमुख, आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे, राज्याचे प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव रमेश बियाणी, विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष राम मेकले, छत्रपती संभाजीनगरचे सहायक ग्रंथालय संचालक सुनील हुसे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रभाकर कापसे यांची उपस्थिती राहणार आहे. सोमवारी सकाळी ९ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून ग्रंथदिंडी निघेल. या ग्रंथदिंडीचे पूजन जिल्हा ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष डॉ. ब्रिजमोहन झंवर, डॉ. आरती झंवर, दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव गायकवाड यांच्या हस्ते होईल. दुपारी वसंतराव हंकारे यांचे ‘बाप समजून घेताना’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  ज्येष्ठ कवी, साहित्यिक भारत सातपुते हे राहणार आहेत. सायंकाळी  ज्येष्ठ साहित्यिक फ. म . शहाजिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होईल.
मंगळवारी सकाळी १०.३० वाजता बालकांचे कथाकथन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाल  साहित्यिक रमेश चिल्ले हे राहणार आहेत. तसेच प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली ‘वाचन आधी की लेखन आधी’ या विषयावरील परिसंवाद होणार आहे. यामध्ये चंद्रशेखर मलकमपट्टे, प्रा. राजशेखर सोलापूरे, विवेक सौताडेकर सहभागी होणार आहेत.  दुपारी जी. जी. कांबळे यांच्य्या अध्यक्षतेखाली कथाकथन होणार आहे.  कथाकथनात  धनंजय गुडसूरकर, नयना राजमाने, विलास सिंदगीकर, अंबादास केदार हे सहभागी होणार आहेत. दुपारी अडीच वाजता ‘साहित्याने मला काय दिले’ या विषयावरील परिसंवाद होणार आहे.
अध्यक्षस्थानी  प्रा. डॉ. शेषेराव मोरे हे राहणार असून प्रमुख वक्ते म्हणून सुरेंद्र पाटील, जयद्रथ जाधव, मोहिब कादरी, अनंत कदम उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी साडेपाच वाजता ग्रंथोत्सवाचा  समारोप समरमभ होणार आहे. समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे हे राहणार आहेत. यावेळी सहायक ग्रंथालय संचालक सुनील हुसे, जिल्हा कोषागार अधिकारी उज्वला पाटील, जिल्हा माहिती अधिकारी तानाजी घोलप, जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय मस्के आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.  या ग्रंथोत्सवात लातूर जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक ग्रंथालयांचे पदाधिकारी, ग्रंथपाल, कर्मचारी व ग्रंथप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन ग्रंथोत्सव समन्वय समिती व ग्रंथोत्सव संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR