24.1 C
Latur
Monday, June 24, 2024
Homeनांदेडडम्परच्या धडकेत दोन ठार

डम्परच्या धडकेत दोन ठार

एक गंभीर जखमी, नांदेडच्या बिलोलीतील घटना

बिलोली : प्रतिनिधी
बिलोली तालुक्यातील सगरोळी वाळू डेपो क्रमांक दोन येथून वाळूने भरलेल्या हायवाच्या धडकेने दोन तरूणांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक गंभीर जखमी आहे ही घटना रविवार दि. २६ मे रोजी सगरोळी बसस्टॉप जवळ सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली.

याविषयी माहिती अशी की बिलोली तालुक्यातील नव्यानेच सुरू झालेल्या सगरोळी वाळू घाट डेपो क्रमांक दोन मधून भरून निघालेले हायवा क्रमांक एम एच ०४ एफ.जे.९७०९ हे सगरोळी येथून देगलूर कडे जात असताना समोरून येत असलेल्या दुचाकी क्रमांक टी.एस.१६ इ.वाय. ८६७८ ला जोराची धडक दिली या धडकेत दुचाकी वरील मोईन शेख वय ३५ राहणार हिप्परगा तालुका बिलोली व नवीन संग्राम पवार (वय २५ रा. सगरोळी तालुका बिलोली) या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक तेलंगानातील तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला नांदेडच्या रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. वृत्त लिही पर्यंत दोघांचेही मृतदेह जाग्यावरच होते. पुढील तपास बिलोली पोलिस करीत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR