28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeराष्ट्रीयछत्तीसगडच्या बिजापूरमध्ये दोन नक्षलवादी ठार

छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये दोन नक्षलवादी ठार

नवी दिल्ली : छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये आज पुन्हा पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. ज्यामध्ये पोलिसांनी दोन नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माड्डे पीएस सीमेखालील जंगल परिसरात सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. बिजापूरचे पोलिस अधीक्षक जितेंद्र यादव यांनी सांगितले की, माड्डे पीएस सीमेवरील जंगल परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. ठार झालेल्या दोन्ही नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, माड्डे पोलिस स्टेशन अंतर्गत येणा-या कोरंजेड-बांडेपारा येथील जंगलात माडदेड एरिया कमिटीचे एसीएम बुचन्ना, विश्वनाथ, बामन आणि इतर १५-२० सशस्त्र माओवादी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे डीआरजी विजापूरच्या पथकाकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली होती, या दरम्यान, आज पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR