24.1 C
Latur
Friday, January 24, 2025
Homeपरभणीआयशरच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जखमी

आयशरच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जखमी

चारठाणा : आयशर ट्रकमध्ये जनावरे निर्दयीपणे भरून बेकायदा वहतूक करीत असताना भरधाव वेगात व निष्काळजीपणे वाहन चालवून एका दुचाकीस्वारास जिंतूर – जालना रस्त्यावरील देवगाव फाटा येथे धडक देऊन ट्रकचालक पळून गेल्याची घटना रविवार, दि.२४ रात्री ९च्या सुमारास घडली.

या अपघातात दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले आहेत. दरम्यान पोलिसांनी १ लाख ४० हजार रुपये किमतीची जनावरे तसेच ५ लाख रुपये किंमतीचे वाहन असा एकूण ६ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करून संबधित वाहन चालक व मालक यांच्याविरुद्ध चारठाणा पोलीस ठाण्यात सोमवार, दि.२५ रात्री गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR