20.4 C
Latur
Monday, November 4, 2024
Homeसोलापूरदोन कोठे मध्य आणि उत्तरच्या आखाड्यात!

दोन कोठे मध्य आणि उत्तरच्या आखाड्यात!

सोलापुरला उत्सुकता : काका जिंकणार की पुतण्या?

सोलापूर : मनोजकुमार भालेराव
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी केवळ महायुतीनेच नाही, तर महाविकास आघाडीने आपले मोठे डाव खेळायला सुरुवात केली आहे. सोलापूर शहरातील राजकारणात कोठे घराण्याचे नाव या ना त्या कारणाने चर्चेत असते एकाच घरातील २ व्यक्तींना विविध मतदारसंघांत उमेदवारी जाहीर झाल्याने पुन्हा एकदा कोठे घराणे चर्चेला आले आहे.

सोलापूर शहर उत्तरमधून महेश कोठे यांना राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली. असे असताना सोलापूर मध्यमधून त्यांचेच पुतणे देवेंद्र कोठे यांना भाजपकडून उमेदवारी निश्चित केल्याने जिल्ह्यात चर्चेला उधाण आले. महेश कोठे (राष्ट्रवादी शरद पवार पक्ष) आणि विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्यात थेट लढत होणार आहे तर दुसरीकडे देवेंद्र कोठे यांच्या विरुद्ध एमआयएम पक्षाचे उमेदवार फारूख शाब्दी व काँग्रेसकडून निश्चित होणा-या उमेदवाराचे कडवे आव्हान असणार आहे. जातीय समीकरण पाहता भाजपने कोठे यांना उमेदवारी देऊन इथली जातीय समीकरणे मजबूत केल्याचे दिसते. लोकसभेला बसलेल्या चटक्यामुळे भाजपने सूक्ष्म नियोजन करत मध्यची उमेदवारी देवेंद्र कोठे यांना दिली.

भाजपने कंबर कसली आहे तर दुसरीकडे शरद पवार हे देखील आपली एक एक चाल खेळताना दिसत आहेत. भाजपच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीने आपले सुरूंग पेरायला सुरुवात केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR