22.1 C
Latur
Friday, December 13, 2024
Homeमहाराष्ट्रजळगावात दोन ‘गुलाब’ पुन्हा भिडले

जळगावात दोन ‘गुलाब’ पुन्हा भिडले

जळगाव : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. आता शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी देवकर यांचे भ्रष्टाचार आपण काढणार असून त्यांना सोडणार नसल्याचा इशारा दिला आहे.

त्यामुळे जळगावमध्ये गुलाबराव पाटील विरुद्ध गुलाबराव देवकर यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून गुलाबराव पाटील तर महाविकास आघाडीकडून गुलाबराव देवकर यांच्यात चुरशीची लढत झाली होती. या लढतीत गुलाबराव देवकर यांचा पराभव झाला होता. या पराभवानंतर देवकर यांनी आपण अजित पवार यांच्या गटात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते.

यानंतर गुलाबराव पाटील यांनी देखील आपण त्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार असून त्यांना सोडणार नसल्याचा थेट इशारा दिला आहे. यामुळे निवडणुकीनंतर पुन्हा एकदा गुलाबराव विरुद्ध गुलाबराव असा सामना जळगावमध्ये पाहायला मिळत आहे.

सत्ताधारी पक्षात जाण्याची घाई का?
विरोधी पक्षात राहून आपल्याला आणि आपल्या कार्यकर्त्यांना कामे करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने आपण निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे गुलाबराव देवकर यांनी म्हटले. तर दुसरीकडे गुलाबराव देवकर यांना पराभव झाल्यानंतर सत्ताधारी पक्षात जाण्याची घाई का झाली? त्यांचे अनेक ठिकाणी असलेले भ्रष्टाचार टाळता यावे यासाठी ते असा प्रयत्न असल्याचा गुलाबराव पाटील यांनी म्हटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR