पुणे : प्रतिनिधी
रविवारी रात्री पुण्यात एका माजी नगरसेवकाची गोळ्या घालून आणि धारदार शस्त्राने हत्या केली. चार ते पाच बाईकवरुन आलेल्या तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हल्ला केला. आंदेकर यांच्यावर आरोपींनी पाच गोळ्या चालवल्या आणि त्यानंतर धारदार शस्त्राने हल्ला केला. या प्रकरणात त्यांच्या दोन सख्ख्या बहिणी आणि त्यांच्या मेहुण्यांना अटक केली आहे.
दरम्यान, पुण्यात भरचौकात रविवारी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर खळबळ उडाली. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. कौटुंबिक आणि वर्चस्वाच्या वादातून वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली. पुणेपोलिसांनी याप्रकरणी त्यांच्या दोन सख्ख्या बहिणी आणि त्यांच्या मेहुण्यांना अटक केली आहे. वनराज यांची पाच गोळ्या झाडून आणि नंतर कोयत्याने वार करत हत्या करण्यात आली. वनराज यांच्या हत्येमागे त्यांच्या कुटुंबियांचाच हात असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरु केला असून इतर आरोपींचा शोध सुरु आहे. जयंत कोमकर, गणेश कोमकर, संजीवनी कोमकर आणि कल्याणी कोमकर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
रविवारी रात्री समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत नामदार चौक येथे वनराज आंदेकर आणि त्यांचा चुलत भाऊ उभे होते. त्यावेळी बाईकरुन आलेल्या आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि धारदार शस्त्राने हल्ला केला. वनराज यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणात आतापर्यंत वनराज यांच्या दोन सख्ख्या बहिणी आणि दोन मेहुण्यांना आरोपी करुन अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींचा शोध सुरु आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.