35.1 C
Latur
Friday, May 24, 2024
Homeमहाराष्ट्रधारावी वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात

धारावी वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात

मुंबई : मुंबई ‘धारावी वाचवा, मुंबई वाचवा’ या मागणीसाठी विरोधी पक्षांचा मोर्चा निघणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करणार आहेत. मोर्चासाठी धारावी सज्ज झाली आहे. टी जंक्शन ते अदाणी समूहाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा निघेल.
या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिलेली नसून हा मोर्चा काढणारच, असा निर्धार धारावी बचाव आंदोलनाने केला आहे.

गेल्या १९ वर्षांपासून रखडलेला धारावी पुनर्विकास अदानी समूहाच्या वतीने मार्गी लावण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत; मात्र प्रकल्पाच्या विरोधात आता वातावरण तापले आहे. धारावी वाचवा या मागणीसाठी उद्याचा सर्व राजकीय विरोधी पक्षांचा भव्य मोर्चा निघणार आहे.

या मोर्चात १४ राजकीय पक्षांचे नेते आणि सामाजिक संस्था आणि रहिवासी सहभागी होणार आहेत. धारावीतील आणि धारावीबाहेरचे असे एक लाख लोक या मोर्चात सहभागी होतील, अशी माहिती धारावी बचाव आंदोलनाचे समन्वयक राजू कोरडे यांनी दिली. उद्या निघणा-या मोर्चाच्या मार्गावर बॅनर्स लावण्यात आले आहेत. संपूर्ण परिसर भगवा झाला आहे. या मोर्चाची तयारी झाली असल्याची माहिती कोरडे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR