22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeनांदेडनांदेडात अवकाळीचे थैमान; १ ठार, ११ जनावरे दगावली, अनेक जखमी

नांदेडात अवकाळीचे थैमान; १ ठार, ११ जनावरे दगावली, अनेक जखमी

नांदेड : प्रतिनिधी
जिल्ह्यात अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला असून रविवारी दुपारी २ वाजल्यापासून जोरदार पाऊस झाला. विजेच्या कडकडाटांसह काही ठिकाणी पावसाने रौद्ररूप धारण केले होते. हदगाव तालुक्यातील धानोरा येथील एका शेतक-याचा वीज अंगावर पडून मृत्यू झाला तर मुखेड तालुक्यातील तुपदाळ येथे घरावरी तीन पत्रे उडाली मार लागून एका महिलेसह तिघें जखमी झाले आहेत. जिल्ह्यात एकूण ११ जनावरांचा मृत्यू झाला आहे.

रविवारी दुपारी २ वाजल्यापासून शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा तडाका बसला. जिल्ह्यातील नायगाव, धर्माबाद, हदगाव, मुखेड भोकर माहुर तालुक्यात वादळी वा-यासह विजेच्या कडाक्यासह पावसाची जोरदार बॅटिंग झाली. अवकाळी पावसामुळे हदगाव तालुक्यातील धानोरा ता येथील शेतकरी रामराव गंगाराम वानखेडे वय अंदाजे ७५ वर्ष यांचा वीज आगावर पडून मृत्यू झाला. तर बिलोली तालुक्यातील डोणगाव खुर्द येथे वीज पडून प्रशांत बालाजी कसल्लू व बालाजी सायना कसल्लू यांचे दोन गाई एक कारवड व एक लहान वासरू विज पडून दगावले.

धर्माबाद तालुक्यातील मौजे जुनी येथील शेतकरी देवराव संभाजी कदम यांच्या मालकीचे दोन बैल शेतात आज दुपारी चारच्या दरम्यान वीज पडून दगावले आहेत. नायगाव तालुक्यातील मेळगाव येथील शेतकरी बालाजी गोंिवदराव शिंदे यांच्या बैलावर वीज पडून दगावला आहे. बळेगाव येथील दिगंबर किसन बेलकर यांची बैल जोडी वीज पडून दगावली आहे. तर. टाकळी तब येथील मारोती सटवाजी मोरे यांची म्हैस वीज पडुन मयत झाली आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर रविवारी पुन्हा अवकाळी पावसाने थैमान मांडले. जिल्ह्यात रब्बी पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी हळद काढणी ही सध्या सुरू आहे. त्यामुळे शेतात वाळू घातलेल्या हळदीचे नुकसान अवकाळी पावसामुळे झाले आहे शेतकरी दुहेरी संकटात सापडले असून पेरणीचा मोसम जवळ येत असल्यामुळे खरीप पेरणीच्या तयारीच्या तयारीसाठी शेती मशागतीचे काम करत असताना अवकाळी पावसामुळे पुन्हा शेतक-यांना जेरीस आणले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR