22.2 C
Latur
Wednesday, October 23, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात अवकाळी पावसाची हजेरी

पुण्यात अवकाळी पावसाची हजेरी

पुणे : प्रतिनिधी – सकाळपासून शहर आणि परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली.

सकाळपासून ढगाळ वातावरण होते आणि हलक्या स्वरूपाच्या सरींना सुरुवात झाली. अगदी थंडीच्या कालावधीत अवकाळी पाऊस होत असल्याने रेनकोट आणि छत्री बाहेर काढण्याची वेळ नागरिकांवर आली.

हवामान खात्याच्या सांगण्यानुसार अरबी समुद्र ते गुजरात दरम्यान कमी दाबाची द्रोणीय स्थिती निर्माण झाली असून वारे देखील अधिक वेगाने वाहत असल्याने अवकाळी पावसाच्या सरी येत आहेत. विदर्भ वगळता राज्याच्या अन्य भागात येत्या दोन दिवसांत पावसाच्या हलक्या सरी येण्याची शक्यता खात्याने वर्तविली आहे तसेच किमान तापमानात ३ ते ४ डिग्री से. ने घट होण्याची शक्यता आहे.

त्याचप्रमाणे शहर आणि परिसरात देखील वातावरण ढगाळ राहून तुरळक सरी येण्याची शक्यता आहे. दोन दिवसांनंतर किमान तापमान कमी होण्याचा अंदाज आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR