23.2 C
Latur
Monday, December 23, 2024
Homeसोलापूरजो पर्यंत अमित शहा राजीनामा देत नाही तो पर्यंत काँग्रेस पक्ष आंदोलन सुरू ठेवणार...

जो पर्यंत अमित शहा राजीनामा देत नाही तो पर्यंत काँग्रेस पक्ष आंदोलन सुरू ठेवणार : खा. प्रणिती शिंदे

सोलापूर ( प्रतिनिधी ) राज्यसभेत अमित शहा यांनी त्यांच्या भाषणात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अपमानजनक वक्तव्य केल्याबद्दल त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी, अमित शहांनी माफी मागावी, त्यांना मंत्रीमंडळातून काढून टाकावी या मागणीसाठी, सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने खासदार प्रणिती शिंदे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा पासून नवीन जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत काढण्यात आली. यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांना निवेदन देऊन अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.यावेळी अमित शहां विरोधात जोरजोरात घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, राज्यसभेत गृहमंत्री अमित शहा यांनी संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमान केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा समता, समानता आणि न्यायाचा आदर्श पाळण्याचा सल्ला भाजपला आवडला नाही, इतकेच नव्हे तर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करून संघ व भाजपचा मनुवादी मानसिकता उघड केली. अमित शहा असे म्हणाले कि, आता फॅशन झाली आहे आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर यांच्या नावा ऐवजी देवाचे एवढे नाव घेतले असते तर सात जन्म स्वर्गात गेला असता. पण आम्हाला भाजपचा स्वर्ग नको देशातील जनतेच्या ताकदीवर स्वर्ग निर्माण करू. भाजपच्या आरक्षण संपवण्याच्या कटाचा भाग म्हणून संविधान बदलण्याचा भाजपचा प्रयत्न २०२४ च्या निवडणुकीत जनतेने हाणून पाडला आणि कुबड्या घेतलेले सरकार स्थापन करण्यास भाग पाडून लोकशाही मूल्यांचा धडा शिकवला.

मात्र हा राग आता राज्यघटनेच्या निर्मात्यावर भाजप काढत असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करण्यात आला आहे. पण खेदाची बाब म्हणजे अमित शहांना यांना धडा शिकवण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण करत आहेत. काँग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, मात्र मोदी सरकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणे गुन्हा मानायला तयार नाही. भाजपने संसदेचे कामकाज रोखले. एवढेच नाही तर आपल्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या काँग्रेस खासदारांना मारहाण करून पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना खाली पाडण्यात आले. भाजपने षड्यंत्राचा एक भाग म्हणून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात गंभीर कलमांखाली एफआयआर दाखल केला आहे. भाजप आणि त्यांची मूळ संघटना नेहमीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानविरोधी राहिली आहे. त्यांनी तिरंगा आणि संविधान बनविल्यापासूनच विरोध केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केल्याप्रकरणी अमित शहा यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर काँग्रेस पक्ष ठाम आहे. जोपर्यंत अमित शहा राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार आहोत.

या सन्मान मोर्चात खासदार प्रणिती शिंदे, शहर अध्यक्ष चेतन नरोटे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, सुशीला आबुटे, मा. नगरसेवक प्रवीण निकाळजे, रियाज हुंडेकरी, आरिफ शेख, विनोद भोसले, श्रीदेवी फुलारे, आशाताई म्हेत्रे, मधुकर आठवले, दत्तू बंदपट्टे, मनोज यलगुलवार, अशफाक बळूरगी, सुदीप चाकोते, प्रमिला तुपलवंडे, गणेश डोंगरे, रॉकी बंगाळे, नजीब शेख, नागनाथ कदम, भीमाशंकर टेकाळे, केशव इंगळे, बसवराज म्हेत्रे, हणमंतू सायबोळू, विश्वनाथ साबळे, संध्याताई काळे, संघमित्रा चौधरी, हेमा चिंचोळकर, मिरा घटकांबळे, वाहिद बिजापुरे, महेश लोंढे, देविदास गायकवाड, बाबुराव म्हेत्रे, लखन गायकवाड, बंटी चंदनशिवे, भोजराज पवार, अशोक कलशेट्टी, रवी आंबेवाले, अनिल मस्के, सिद्धाराम चाकोते, तिरूपती परकीपंडला, हारून शेख, सुमन जाधव, करीमुनिःसा बागवान, निशा मरोड, दिनेश म्हेत्रे, श्रिशैल रणधीरे, रमेश हसापुरे, संतोष सोनवणे, गिरिधर थोरात, विवेक कन्ना, रुपेश गायकवाड, राजेश झंपले, शोभा बोबे, सोहेल पठाण, शिवशंकर अंजनाळकर, संजय गायकवाड, विवेक इंगळे यांच्यासह इतर पदाधिकारी नागरिक उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR