विजयवाडा : वृत्तसंस्था
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगमोहन रेड्डी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ््याचे अनावरण केले. विजयवाडा येथे उभारण्यात आलेला हा डॉ. आंबेडकरांचा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. या पुतळ््याची उंची २०६ फूट इतकी आहे. हा पुतळा ८१ फुटाच्या पॅडस्टलवर उभा आहे.
पॅडस्टलशिवाय त्याची उंची १२५ फूट इतकी होती. स्वराज मैदानावर उभारण्यात आलेल्या या पुतळ््याजवळ एक्सपिरियन्स सेंटर, २ हजार लोक बसू शकतील, असे कन्व्हेन्शन सेंटर, एक फूड कोर्ट, मुलांना खेळण्यासाठी जागा, जलकुंभ, संगीत कारंजे अशा सुविधा आहेत. ज्या मैदानावर पुतळा उभारण्यात आला, त्याचे नाव डॉ. बी. आर. आंबेडकर स्वराज्य मैदान असे करण्यात आले आहे.
हा देशातील सर्वात उंच बिगर-धार्मिक पुतळा आहे.
तसेच याची निर्मिती पूर्णपणे भारतीय असल्याचे सांगण्यात आले. हा संपूर्ण प्रकल्प नोएडा येथील डिझाइन असोसिएट्स यांनी तयार केला आहे. ज्यात डॉ. बी. आर. आंबेडकर एक्सपिरियन्स सेंटर, कन्व्हेन्शन सेंटर आदी गोष्टींचा समावेश आहे. डॉ. आंबेडकरांच्या पुतळ््याच्या निर्मितीची घोषणा राज्य सरकारने २०२० मध्ये केली होती. यासाठी २६८ कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला होता. पुतळ््याच्या आणि स्वराज मैदानावरील कामाला जून २०२० मध्ये सुरुवात झाली होती.
पुतळा कामासाठी २ वर्षांची मेहनत
या कामासाठी ५०० कर्मचारी आणि ५५ इंजिनिअर २ वर्षे मेहनत घेत होते. या पुतळ््यासाठी ४०० टन स्टेनलेस स्टील आणि १२० टन ब्राँझचा वापर करण्यात आला आहे. या ठिकाणी २ मिनी थिएटरदेखील असून येथे आंबेडकरांवरील लघुपट दाखवले जाणार आहेत. परिसरात ६ जलकुंभ असून प्रकल्पाच्या मध्यभागी संगीत कारंजा करण्यात आला आहे.
सामाजिक न्यायाचा पुतळा
स्वराज मैदानावर उभारण्यात आलेला हा जगातील सर्वात उंच पुतळा असून, या आंबेडकरांच्या पुतळ््याला सामाजिक न्यायाचा पुतळा असे नाव देण्यात आले आहे.
जगातील सर्वांत उंच
५० पुतळ््यांत समावेश
जगातील सर्वात उंच ५० पुतळ््यांमध्ये याचा समावेश असणार आहे. या यादीत गुजरातमधील सरदार पटेल यांचा ७९० फूट पुतळा सर्वात उंच आहे तर आंबेडकरांचा दुस-या क्रमांकाचा सर्वात उंच पुतळा तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे आहे.