नवी दिल्ली : विरोधकांकडून तीव्र आक्षेप घेतला जात असतानाही वक्फ (संशोधन) विधेयक २०२४ आज राज्यसभा आणि लोकसभेमध्ये सादर करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप घेत गोंधळ घातला. विरोधकांकडून गदारोळ सुरू असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठे विधान केले आहे.
ते म्हणाले की, जर विरोधी पक्षांनी घेतलेल्या आक्षेपांचा अहवालात समावेश करायचा असेल, तर त्याला आमच्या पक्षाकडू कुठलाही विरोध नसेल. काही विरोधी पक्षांच्या सदस्यांनी आपले मत अहवालात पूर्णपणे समाविष्ट करण्यात आलेले नसल्याचे म्हणत चिंता व्यक्त केली आहे.
मी माझ्या पक्षाच्या वतीने सांगू इच्छितो की, विरोधी पक्षांकडून व्यक्त करण्यात आलेल्या चिंता विचारात घेऊन त्यात काहीही जोडता येईल. त्याला आक्षेप नसेल.
दरम्यान, आज संसदेमध्ये वक्फ (संशोधन) विधेयक २०२४ संसद में वक्फ सादर होत असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये प्रचंड वादावादी झाली. संयुक्त संसदीय समितीमध्ये नोंदवलेले असहमतीचे मुद्दे या अहवालातून हटवण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात आला.
लोकसभेमध्ये संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष आणि भाजपा खासदार जगदंबिका पाल यांनी हे विधेयक सादर केले. यावेळी, सत्ताधा-यांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. तर विरोधी पक्षांनी या विधेयकाला विरोध करत गोंधळ घातला.
या गोंधळादरम्यानच अमित शाह यांनी स्पष्टपणे सांगितले की, सरकारच असहमतीचे मुद्दे जोडण्यास कुठलाही आक्षेप नाही आहे. आपले मत पूर्णपणे समाविष्ट केलेले नाही, असा आक्षेप काही विरोधी पक्षांच्या सदस्यांनी घेतला आहे. त्याबाबत मी माझ्या पक्षाच्या वतीने विनंती करतो की, विरोधी पक्षांच्या सहमतीला संसदीय प्रक्रियेमध्ये योग्यपणे समाविष्ट करण्यात यावे त्यासाठी आम्हाला कुठलाही आक्षेप नसेल.