22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeअंतरराष्ट्रीयभारतासाठी अमेरिकेचा व्हिसा पायलट प्रोग्राम

भारतासाठी अमेरिकेचा व्हिसा पायलट प्रोग्राम

अमेरिकेचा एच-१बी व्हिसाबाबत मोठा निर्णय भारतीयांना होणार सर्वाधिक फायदा

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या बायडेन सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे ज्याचा भारतीयांना मोठा फायदा होणार आहे. अमेरिकन सरकारने एच-१बी व्हिसाच्या देशांतर्गत नूतनीकरणासाठी पायलट कार्यक्रम सुरू केला आहे. २४ जानेवारीपासून हा उपक्रम सुरू होणार आहे. हा एच-१बी व्हिसा पायलट प्रोग्राम फक्त भारतीय आणि कॅनेडियन नागरिकांसाठी आहे. या अंतर्गत अमेरिकेत काम करणा-या भारतीय आयटी प्रोफेशनल्स आणि कॅनडाच्या नागरिकांना फायदा होणार आहे. हा कार्यक्रम अशा कंपन्यांसाठी देखील आहे, ज्यांचे एच-१बी कर्मचारी कामासाठी परदेशात जाऊ इच्छितात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौ-यानंतर अनेक महिन्यांनी अमेरिकेने हा निर्णय घेतला आहे. जूनमध्ये, जेव्हा पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या राज्य दौ-यावर गेले होते, तेव्हा एच-१बी व्हिसाच्या नूतनीकरणाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी काम सुरू होते. पंतप्रधान मोदींच्या दौ-याच्या वेळी या कार्यक्रमाची औपचारिक घोषणा करण्यात आली.

व्हिसाचे नूतनीकरण कसे केले जाते?
एच-१बी व्हिसा हा नॉन-इमिग्रंट व्हिसा आहे. हे अमेरिकन कंपन्यांना परदेशी कामगार ठेवण्याची परवानगी देते. जेव्हा एखादी व्यक्ती अमेरिकन कंपनीत काम करते, तेव्हा त्या व्यक्तीला एच-१बी व्हिसा दिला जातो. आत्तापर्यंत असे होते की, एखाद्या व्यक्तीचा एच-१बी व्हिसाची मुदत संपली असेल, तर त्याचे नूतनीकरण करून घेण्यासाठी त्याला पुन्हा त्याच्या देशात परतावे लागत होते. मात्र, आता नूतनीकरण प्रक्रियेसाठी घरी यावे लागणार नाही.

भारतीयांना काय होणार फायदा?
भारतीय-अमेरिकन समुदायाचे नेते अजय जैन भुटोरिया यांनी बायडन सरकारच्या या निर्णयाचे वर्णन महत्त्वाचे असे केले आहे. एच-१बी व्हिसाच्या नूतनीकरणाची प्रक्रिया सोपी केल्याने सुमारे १० लाख लोकांना फायदा होईल आणि त्यात मोठी संख्या भारतीयांची असेल. लाखो भारतीय अमेरिकेत काम करत आहेत. २०२२ मध्ये, यूएस सरकारने ४.४२ लाख लोकांना एच-१बी जारी केला होता. त्यापैकी ७३ टक्के भारतीय होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR