सेलू : प्रतिनिधी
सेलू येथील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर मंगळवार दिनांक ८ ऑक्टोबर रोजी नवरात्रीनिमित्त सुरेश नागरे आयोजित सौभाग्यवती खेळ पैठणीचा या कार्यक्रमात बंदी असतानाही डीजे व लेझरचा मोठ्या प्रमाणात वापर झाला असून पोलिस स्टेशनच्या अगदी समोर व हाकेच्या अंतरावर कार्यक्रम चालू होता त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार का ? असा सवाल नागरिकांतून होत आहे.
शासनाने व न्यायालयाने नेहमी करिताच डीजे व लेझर च्या वापरावर बंदी घातलेली असतानाही सेलू येथील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर जिंतूर येथील सुरेश नागरे यांच्या वतीने आयोजित केलेल्या सौभाग्यवती खेळ पैठणीचा, सन्मान नारी शक्तीचा, खेळ मानाच्या पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मात्र आयोजकाकडून शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन न करता सर्रासपणे डीजे व लेझरचा वापर केलेला असून सदरचा कार्यक्रम पोलिस स्टेशन सेलूच्या अगदी समोरच संपन्न होत होता.
निर्बंधहे सर्वांसाठी असून सर्वांनी त्याचे पालन करावयास हवे. मात्र त्याचा विसर राजकीय पदाधिकाऱ्याकडून सतत होत असून त्यांच्यावर कार्यवाही होईल का ? अशी विचारणा करण्यात येत आहे.