24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयमहिन्याच्या बजेटसाठी वापरा ५०-३०-२० चा फॉर्म्युला!

महिन्याच्या बजेटसाठी वापरा ५०-३०-२० चा फॉर्म्युला!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
तुमचे उत्पन्न लाखभर असो की काही हजार, महिन्याचे आर्थिक नियोजन करणे खूप महत्त्वाचे आहे. बजेट हा आर्थिक नियोजनाचा गाभा आहे. कोणतेही आर्थिक ध्येय गाठण्यासाठी तुम्ही केलेल्या नियोजनाशी चिकटून राहणे गरजेचे आहे.

आर्थिक नियोजन म्हणजे खर्चाचा हिशेब असा अनेकांचा गैरसमज आहे. मात्र, बजेट म्हणजे धनसंचय करण्याची गुरुकिल्ली आहे. तुमच्या गरजा, भविष्यातील तरतूद आणि आर्थिक स्वातंत्र्य उपभोगायचे असेल तर आत्तापासूनच नियोजन करणे आवश्यक आहे. या सर्व गोष्टी साध्य करण्यासाठी तुमच्यामध्ये आर्थिक शिस्त यायला हवी. यासाठी तुम्ही ५०-३०-२० चा फॉर्म्युला वापरू शकता.

५०-३०-२० चा नियम तुम्हाला आर्थिक नियोजन करण्यासाठी रोडमॅप देतो. एसबीआय सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, तुमच्या गरजांवर होणारा खर्च, खर्चानंतर बचत आणि बचतीतून गुंतवणूक करण्यासाठी हा नियम उपयोगी येतो.
नियमानुसार तुमच्या निव्वळ उत्पन्नापैकी अर्धा किंवा ५० टक्के तुमच्या गरजांसाठी बाजूला ठेवावा. यामध्ये अन्न, कपडे, भाडे, आरोग्यसेवा, विमा प्रीमियम, मुलांचे शिक्षण, आर्थिक जबाबदा-या इत्यादी खर्चाचा समावेश होतो. एसबीआय सिक्युरिटीजच्या मते, या मूलभूत गरजा आहेत आणि तुम्ही या विभागात फारशी तडजोड करू शकत नाहीत.

निवृत्तीचे टेंशन होईल दूर
नियमाचा दुसरा भाग म्हणजे तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमच्या उत्पन्नाच्या ३० टक्के वाटा ठेवणे. उदाहरणार्थ, यामध्ये महत्त्वाकांक्षी लाईफस्टाईल, मोठे घर, हौसमजा, सुट्या, मनोरंजन इत्यादींचा समावेश असू शकतो. या संपूर्ण ३० टक्क्यातील निधी खर्च झाला नाही. तर तो भाग बचतीसाठी वापरू शकता. नियमातील शेवटचा पण महत्त्वाचा हिस्सा.

यामध्ये आणीबाणीसाठी बचत
गृहकर्ज मार्जिन, कार लोन, दीर्घकालीन उद्दिष्टे जसे की सेवानिवृत्ती, मुलाचे शिक्षण इत्यादींचा समावेश होतो. यात कर आणि पीएफ कपातीनंतरचे निव्वळ उत्पन्न २० टक्के मानले गेले आहे. याचा अर्थ तुमची प्रभावी बचत तुमच्या निव्वळ उत्पन्नाच्या २०टक्क्यांपेक्षा जास्त असेल आणि तुमच्या आर्थिक भविष्यासाठी महत्त्वाची आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR