बीड : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी परळीतील मयत सरपंच बापू आंधळे खून प्रकरणाशी संबंधित एक व्हीडीओ ट्विट केला आहे. हा व्हीडीओ महादेव गित्ते याचा असून २९ जून २०२४ रोजी परळी तालुक्यातील मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांच्या खुनाशी संबंधित आहे.
सरपंच आंधळे यांच्यावर झालेल्या गोळीबारादरम्यान महादेव गित्ते याच्यावर देखील गोळीबार झाला होता. यात तो जखमी झाला होता. यादरम्यान रुग्णालयात दाखल केले असता महादेव गित्ते याने व्हिडिओ चित्रेत केला होता. ज्यात गित्तेने घडलेला प्रकार सांगितला आहे. २९/०६/२०२४ रोजी माहादेव गित्ते याच्यावर वाल्मीक कराड च्या सांगण्यावरून हल्ला झाला जखमी इसमाचा आंबेजोगाई मेडिकल कॉलेज मधे उपचार घेत आसताना दि ०२/०७/२०२४ रोजी महादेव गित्ते याने बनवलेला व्हीडीओ आव्हाडांच्या एक्सवर टाकला आहे.
२९ जून २०२४ रोजी महादेव गित्ते याच्यावर वाल्मीक कराड याच्या सांगण्यावरून हल्ला झाला. जखमी इसमाचा आंबेजोगाई मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेत असताना २ जुलै २०२४ रोजी महादेव गत्ते याने बनवलेला व्हीडीओ असे या ट्वीटमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
सरपंच बापू आंधळे खून प्रकरणात परस्परविरोधी गुन्हा दाखल झाला होता. ज्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते बबन गित्ते आणि वाल्मीक कराड याचा देखील समावेश होता. मात्र ठोस पुराव्याअभावी वाल्मीक कराडची निर्दोष मुक्तता झाली होती. आता जितेंद्र आव्हाड यांनी महादेव गीते याचा हा व्हीडीओ ट्वीट करून पुन्हा एकदा सरपंच बापू आंधळे खून प्रकरण पुढे आणले आहे.