27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमनोरंजन‘स्त्री २’ मध्ये वरुण करणार कॅमिओ

‘स्त्री २’ मध्ये वरुण करणार कॅमिओ

मुंबई : श्रद्धाचा बहुचर्चित ‘स्त्री २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. आता एक मोठे अपडेट सिनेमासंदर्भात आले आहे.

दरम्यान, बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर ही तिच्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकते.श्रद्धाच्या चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. श्रद्धाची खासियत म्हणजे ती जेव्हाही चित्रपट घेऊन येते, तेव्हा बॉक्स ऑफिसवर धमाल उडते.

श्रद्धाच्या ‘स्त्री २’ मध्ये प्रेक्षकांना एक मोठं सरप्राईज मिळणार आहे. या चित्रपटात एक अभिनेता कॅमिओ भूमिकेत दिसणार आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून वरुन धवण आहे. सिनेमामध्ये वरुण हा ‘भेडिया’च्या भूमिकेत दिसणार आहे. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, वरुण धवनने अलीकडेच मुंबईतील एका स्टुडिओमध्ये ‘स्त्री’ चित्रपटातील कॅमिओच्या भूमिकेसाठीचे शूटिंग पूर्ण केले आहे.

श्रद्धा कपूरची प्रमुख भूमिका असलेला ‘स्त्री’ हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या पहिल्या भागात श्रद्धा कपूर, राजकुमार राव, अपारशक्ती खुराणा, पंकज त्रिपाठी, क्रिती सेनॉन, विजय राझ, नोरा फतेही, अभिषेक बॅनर्जी हे कलाकार झळकले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR