20 C
Latur
Sunday, December 1, 2024
Homeउद्योगसणासुदीत भाज्या महागल्या!

सणासुदीत भाज्या महागल्या!

बहुतांश भाज्यांनी ओलांडली शंभरी दरवाढीमुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड

पुणे/मुंबई : नवरात्रोत्सवात घरोघरी होणा-या या उद्यापने आणि व्रतवैकल्यामुळे शाकाहाराला अधिक पसंती आहे. भाज्यांना मागणी वाढल्यामुळे दर वधारले आहेत. बहुतांश भाज्यांनी शंभरी ओलांडली असून, टोमॅटो व कांद्याची साठी तर बटाट्यानींही पन्नाशी पार केली आहे.

दरवाढीमुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. जिल्ह्यात गुरूवारपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. या दिवसात सात्विक शाकाहार घेतला जातो. यामुळे या दिवसात भाज्यांना मागणी वाढते; मात्र, पावसामुळे पिकाचे नुकसान झाल्याने जिल्ह्यात भाजीपाला आवक मंदावली आहे. त्यातच सणवार असल्यामुळे भाज्यांना मागणी वाढली आहे. त्यामुळे दरवाढ झाली असल्याचे सांगण्यात येते. टोमॅटो, हिरवी मिरची, कोबी, वांगी, फ्लॉवर, पावटा, गाजर, घेवडा, फरस बी, गवार, सिमला मिरचीसह मुळा, माठ, पालक, शेपू, मेथी या पालेभाज्यांचीही वाढ झाली आहे.

बाजारात नवीन बटाट्याची आवक होत असून, ४० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. लसणाचे दर अद्याप तेजीतच आहेत. लसूणबरोबरच कांद्यानेही दरात पुन्हा उसळी घेतली असून, २४० ते ३२० रुपये किलो दराने लसणाची विक्री सुरू आहे. कांदा पन्नाशी गाठण्याच्या तयारीत आहे. काही भागात ओला कांदा ३५ ते ४० रुपये दराने विकला जात आहे. कसमादे परिसरातील मोठी बाजार असा नावलौकिक असलेल्या उमराणा बाजार समितीमध्ये दस-याला नव्या लाल कांद्याच्या लिलावाचा सीमोल्लंघन करण्याची व मुहूर्ताला लाल कांद्याला जास्त भाव देण्याची परंपरा आहे. आज दस-याचा मुहूर्त साधण्यासाठी बाजार समिती सुरू ठेवण्यात आली होती. उमराण्याच्या राजेंद्र देवरे यांच्या बैलगाडीला लिलावाचा मान मिळाला. बाजार समितीच्यावतीने त्याचा सत्कार करण्यात आला.

दस-याच्या शुभमुहूर्तावर कांद्याचा लिलाव
आज साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक असणारा दस-याचा शुभमुहूर्त आहे. या सणाचा देशभरात उत्साह पाहायला मिळत आहे. दरम्यान, दस-याच्या शुभमुहूर्तावर नाशिकच्या उमराणा बाजार समितीमध्ये आज नवीन लाल कांद्याच्या लिलावाला सुरुवात झाली आहे. लिलावाच्या सुरुवातीच्या दिवशीच कांद्याला प्रतिक्विंटल ६१६१ रुपयांचा दर मिळाला आहे. उमराण्याच्या राजेंद्र देवरे यांच्या बैलगाडीला लिलावाचा मान मिळाला आहे. आज बाजार समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.

कांद्याच्या दरात चांगली वाढ
यंदा देशभरात चांगला पाऊस झाला आहे. सध्या परतीचा मान्सून देशातील अनेक भागात धुमाकूळ घालताना दिसत आहे. या पावसामुळं अनेक भागात शेती पिकांना फटका देखील बसला आहे. दरम्यान, सध्या कांदा उत्पादक शेतक-यांना अच्छे दिन आले आहेत. कांद्याच्या दरात चांगली वाढ झाली आहे. मात्र, दुसरीकडे ग्राहकांच्या खिशाला झल लागत असल्याचे बोलले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR