16.2 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeउद्योगकांदा, बटाटा, डाळींसह भाज्याही महागल्या

कांदा, बटाटा, डाळींसह भाज्याही महागल्या

घाऊक महागाई १६ महिन्यांचा उच्चांकी पातळीवर

नवी दिल्ली : भाज्यांसह खाद्य वस्तू आणि उत्पादित (मॅन्युफॅक्चर्र्ड) वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे जूनमध्ये घाऊक क्षेत्रातील महागाईचा दर ३.३६ टक्के वाढून १६ महिन्यांच्या उच्चांकावर गेला. सलग चौथ्या महिन्यात घाऊक महागाईचा दर वाढला आहे. घाऊक मूल्य निर्देशांकावर (डब्ल्यूपीआय) आधारित महागाईचा दर मेमध्ये २.६१ टक्के होता. त्याआधी जून २०२३ मध्ये तो शून्याच्या खाली म्हणजेच उणे (-) ४.१८ टक्के होता. वर्ष २०२३ मध्ये तो ३.८५ टक्के होता.

खाद्य वस्तूंच्या वाढलेल्या किमतीबरोबरच कच्चे तेल, नैसर्गिक वायू, खनिज तेल आणि अन्य उत्पादित वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे महागाईचा दर वाढला आहे असे वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने सोमवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले होते. इक्राच्या मुख्य अर्थतज्ज्ञ अदिती नायर यांनी सांगितले की, २०२४ मध्ये महागाईची वाढ व्यापक राहिली. इंधन व वीज वगळता इतर क्षेत्रांतील महागाई वाढली. कच्च्या तेलाचे दर जुलै २०२४ पर्यंत अस्थिर राहिले. मागणी आणि पुरवठा यातील अंतरामुळे मासिक आधारावर दरात वाढ झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR