पुणे : अभिनेता विकी कौशल सध्या त्याच्या आगामी बॅड न्यूज या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन दौरा पुणे शहरातून सुरु झाला. ‘‘कसं काय? कसंय? लय भारी’’, असं विकी कौशल मराठीत बोलताच पुणेकरांचा कमाल प्रतिसाद पाहायला मिळाला. नुकतंच पुणेकरांनी विकी कौशलसोबत मराठीमध्ये संवाद साधला. विकी कौशलच्या ‘बॅड न्यूज’ या आगामी चित्रपटाचं पुण्यामध्ये प्रमोशन पार पडले. यावेळी विकीनेही पुणेकरांसोबत मराठीत संवाद साधला.
धर्मा प्रॉडक्शन्स आणि लिओ मीडिया कलेक्टिव या दोन प्रॉडक्शन कंपनीचा रोमँटिक कॉमेडी चित्रपट ‘बॅड न्यूज’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आनंद तिवारी दिग्दर्शित ‘बॅड न्यूज’ चित्रपटात विक्की कौशल, तृप्ती डिमरी, एमी विर्क हे मूख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘बॅड न्यूज’ हा कॉमेडीपट १९ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. चित्रपटाच्या टीम आता सर्व शहरांमध्ये प्रमोशन करताना दिसत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनची सुरुवात पुणे शहरापासून झाली.
चित्रपटाच्या प्रमोशनवेळी पुणेकरांसोबत आणि पत्रकारांसोबत विक्की कौशलने दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी त्याने म्हटलं की, ‘‘पुण्यात आल्यावर त्याला नेहमी आनंद होतो, पुणेकरांकडून खूप प्रेम मिळते, त्यामुळे पुणे शहराविषयी एक विशेष अशी ओढ वाटते आणि प्रमोशनची सुरुवात देखील पुण्यातून झाली याचा आनंद आहे. हा कौटुंबिक चित्रपट आहे, त्यामुळे कुटुंबासोबत तुम्ही या चित्रपटाचा आनंद घेऊ शकता’’, असं देखील विक्की कौशलने म्हटलं आहे.
‘बॅड न्यूज’ चित्रपटाचे पुण्यामध्ये प्रमोशन
‘बॅड न्यूज’ हा चित्रपट घोषणा झाल्यापासूनच चर्चेत आहे. विकीच्या या कॉमेडी चित्रपटाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील पहिलं गाणं समोर आलं होतं. या गाण्यानेही सर्वांना वेड लावले आहे. तौबा तौबा गाण्यावरील विकी कौशलच्या डान्स मूव्हने चाहत्यांना चांगलीच भूरळ पाडली आहे. या गाण्यातील विकीचा डॅशिंग लूक पाहता प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्कंठा लागली आहे.