22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रधाराशिवमधून विक्रम काळे तर नाशिकमधून छगन भुजबळ महायुतीचे उमेदवार

धाराशिवमधून विक्रम काळे तर नाशिकमधून छगन भुजबळ महायुतीचे उमेदवार

आज सायंकाळी होणार शिक्कामोर्तब

मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीची लगबग जोरात सुरु आहे. धाराशिवच्या जागेवरून महायुतीची मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर खलबते सुरु होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांनी प्रचंड ताकद लावलेल्या धाराशिव व नाशिक मतदारसंघाचा तिढा अखेर सुटल्याचे स्पष्ट झाले आहे.धाराशिवमधून विधान परिषद सदस्य विक्रम काळे यांचे नाव जवळपास फायनल झाले आहे. तर नाशिकमधून मंत्री छगन भुजबळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. चार वाजता पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे आणि त्याचवेळी या दोन उमेदवारांचे नाव घोषित केले जाणार आहेत.

दरम्यान, महायुतीमध्ये धाराशिव, नाशिक हे लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आले आहेत. या जागेवर असलेला तिढा रविवारी रात्री झालेल्या बैठकीत सुटला आहे. त्यानंतर सोमवारी सकाळी देवगिरी या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत धाराशिव, नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार फायनल करण्यात आले आहेत.

धाराशिवमधून विधान परिषद सदस्य विक्रम काळे यांचे नाव जवळपास फायनल झाले आहे. तर नाशिकमधून मंत्री छगन भुजबळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. सोमवारी सकाळी झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पक्षातील नेतेमंडळी उपस्थित होते. यावेळी विधान परिषद सदस्य विक्रम काळे, सतीश चव्हाण उपस्थित होते.
आज सोमवारी ४ वाजता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पत्रकार परिषद घेऊन धाराशिव लोकसभा उमेदवाराची घोषणा करणार आहेत. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

धाराशिव लोकसभेसाठी यावेळी चर्चेत असलेल्या आमदार सतीश चव्हाण, सुरेश बिराजदार, प्रवीणंिसह परदेशी, आमदार विक्रम काळे यांच्या नावावर चर्चा झाली. त्यातून आमदार विक्रम काळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे समजते.

यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने बारामती, रायगड, शिरूरमधून उमेदवाराची घोषणा केली आहे. परभणी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या कोट्यातून रासपच्या चिन्हावरच महादेव जानकर निवडणूक लढणार आहेत. सोमवारी ते फॉर्म भरत आहेत. तर दुसरीकडे धाराशिव आणि नाशिक हे दोन मतदारसंघ बाकी होते. त्यांचे उमेदवार देखील सोमवारी चार वाजता घोषित होणार आहेत. सोमवारी चार वाजता पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे आणि त्याचवेळी या दोन उमेदवारांचे नाव घोषित केले जाणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR