22.3 C
Latur
Sunday, September 29, 2024
Homeलातूर‘विलासराव देशमुख आमच्या हृदयात सदैव जिवंत’

‘विलासराव देशमुख आमच्या हृदयात सदैव जिवंत’

विलासबाग बाभळगाव येथे जनसमुदायाच्या उपस्थितीत १२ व्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली अर्पण

लातूर : प्रतिनिधी
‘लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख यांचा राजकीय प्रवास हा खरोखरच एक प्रेरणादायी प्रवास होता. एका सामान्य ग्रामीण भागातील तरुणाला राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रातील कॅबिनेट मंत्री बनवणारा हा प्रवास त्यांच्या कर्तृत्वाचे प्रमाण आहे. ग्रामीण भागातील जीवन जगल्यामुळे आदरणीय विलासराव देशमुख यांना शेतकरी आणि त्यांच्या समस्यांची खोलवर जाणीव होती. त्यांनी सहकाराच्या माध्यमातून ग्रामविकासाचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. सिंचन सुविधा, कृषी यांत्रिकीकरण आणि कृषीपूरक उद्योगांना चालना देऊन कृषी क्षेत्राचा विकास केला. त्यांच्या १२व्या स्मृतिदिनानिमित्त बाभळगाव येथील विलासबाग येथे देशमुख कुटुंबीय, राज्यभरातून आलेले विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत सार्वजनिक आदरांजली वाहण्यात आली.

बुधवार, दि. १४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता विलासबाग, बाभळगाव येथे ‘भावदर्पण’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला. लातूरसह राज्यभरात यानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आदरणीय विलासराव देशमुख आणि देशमुख परिवारावर प्रेम करणारे स्नेही, मित्र, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांनी स्मृतिस्थळी पुष्पांजली अर्पण करून आपल्या आवडत्या नेत्याला भावपूर्ण आदरांजली वाहिली.

लोकनेते विलासराव देशमुख यांना विलासबाग, बाभळगाव येथे प्रारंभी माजी मंत्री सहकारमहर्षी दिलीपरावजी देशमुख, राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, विलास साखर कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई देशमुख, रीड लातूरच्या संस्थापिका दीपशीखा देशमुख, अभिजीत देशमुख, डॉ. सारिका देशमुख, जयसिंहराव देशमुख यांनी आदरणीय विलासराव देशमुख यांना पुष्पांजली अर्पण केली. देशमुख कुटुंबियांकडून आदरांजली अर्पण केल्यानंतर क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, खासदार शिवाजी काळगे, माजी आमदार वैजनाथराव शिंदे, माजी आमदार त्र्यंबकराव भिसे, माजी आमदार सुधाकर भालेराव, विचारवंत उल्हासदादा पवार, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, निवासी जिल्हाधिकारी जळगाव विजयकुमार ढगे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय अधिकारी रोहिणी न-हे, अविनाश कोरडे, तहसीलदार सौदागर तांदळे, आयुक्त बाबासाहेब मनोहरे, अशोकराव पाटील निलंगेकर, जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव यांनी आदरांजली अर्पण केली.

या आदरांजली कार्यक्रमात माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, चेअरमन सर्जेराव मोरे, चेअरमन शाम भोसले, ललीतभाई शहा, माजी महापौर अ‍ॅड. दीपक सूळ, माजी चेअरमन गणपतराव बाजुळगे, अ‍ॅड. व्ही. बी. बेद्रे, माजी चेअरमन यशवंतराव पाटील, सभापती जगदीश बावणे, व्हा. चेअरमन लक्ष्मण मोरे, अ‍ॅड. समद पटेल, लक्ष्मणराव देशमुख, जितेंद्र देहाडे, धिरज पाटील, व्हा. चेअरमन प्रमोद जाधव, व्हा. चेअरमन विजय देशमुख, व्हा. चेअरमन रवींद्र काळे, व्हा. चेअरमन अनंतराव देशमुख, कल्याण पाटील, अभय साळुंके, प्रशांत पाटील, श्रीपतराव काकडे, शीला पाटील, विद्या पाटील, संतोष सोमवंशी, कार्यकारी संचालक संजीव देसाई, कार्यकारी संचालक ए. आर. पवार, आर. बी. माने, बी. व्ही. मोतीपवळे, चेअरमन बादल शेख, राजाभाऊ जाधव, युवराज देशमुख, अमर खानापुरे, महादेव जटाळ, राजेश्वर देशमुख, अनुप शेळके, डॉ. अरविंद भातांब्रे, गणेश देशमुख, कैलास पाटील, संभाजी रेड्डी, शिवाजी जवळगेकर, लक्ष्मण कांबळे, गिरीश ब्याळे, पत्रकार चंद्रकांत झेरीगुंठे, देवीदास जमदाडे, पप्पू देशमुख, व्यंकटेश पुरी, चंद्रशेखर दंडिमे, संतोष देशमुख, हरिभाऊ गायकवाड, रामराजे आत्राम, चंद्रकांत मद्दे, बंकट पाटील, राजकुमार पाटील, अविनाश देशमुख, गोविंद बोराडे, सुनील पडिले, उपसरपंच गोविंद देशमुख, अ‍ॅड. प्रवीण पाटील, व्यंकटेश पुरी, रमेश देशमुख, एजाज शेख, बालाप्रसाद बिदादा, इम्रान सय्यद, अनिल चव्हाण, संगीता मोळवणे, चांदपाशा इनामदार, निलेश देशमुख, संजय माने, अशोक (गट्टू) अग्रवाल, शाहूराज पवार, शरद देशमुख, प्रदीप राठोड, दिलीप माने, अमर मोरे, दीपक पटाडे, ईश्वर चांडक, भारत लाड, गुरुनाथ गवळी, आनंद वैरागे, लालासाहेब देशमुख महाराज, आबासाहेब पाटील उजेडकर, तानाजी फुटाणे, सुंदर पाटील कव्हेकर, भैरवनाथ सूर्यवंशी, दीपक राठोड, दिनेश नवगिरे, नागसेन कामेगावकर, बालाजी साळुंके, सुभाष घोडके, मदन भिसे, पंडित ढमाले, प्रवीण सूर्यवंशी, लक्ष्मण पाटील, लिंबराज पवार, नवनाथ काळे, काकासाहेब घुटे, महेश काळे, प्रवीण कांबळे, अविनाश बट्टेवार, एन. आर. पाटील, अतुल देऊळगावकर, शफी शेख, अ‍ॅड. अंगद गायकवाड, मारुती पांडे, चंद्रकांत देवकते, तानाजी सूर्यवंशी, चंद्रकांत चिकटे, गट्टू अग्रवाल, राम वाघ, दत्ता सोमवंशी, डी. एन. केंद्रे, रमेश देशमुख, भैरवनाथ पिसाळ, संभाजी सूळ, बबन देशमुख, तबरेज तांबोळी, नारायण पाटील, गोविंद डुरे पाटील, सुभाष माने, संजय पाटील खंडापूरकर, ज्ञानोबा पडिले, अमृत जाधव, असिफ बागवान, श्रीनिवास शेळके, बळवंत काळे, मनोज पाटील, अभिजीत इगे, अ‍ॅड. देविदास बोरुळे पाटील, सुपर्ण जगताप, सतीश पाटील, प्रा. गोविंद घार, रामकृष्ण बांगड, मोहन सुरवसे, सतीश पाटील, अ‍ॅड. अंगद गायकवाड, पत्रकार पंकज जैस्वाल, सत्तारभाई शेख, प्राचार्य अजय पाटील, प्राचार्य मोहन बुके, डॉ. अरविंद भातांब्रे, डॉ. हणमंत किणीकर, सुभाष माने, संतोष सोमवंशी, विनोद वीर, मोहन सुरवसे, अनिल पाटील, संजय निलेगावकर, अंगद वाघमारे, सुलेखा कारेपूरकर, वर्षा मस्के, केशरबाई महापुरे, पृथ्वीराज शिरसाठ, दिलीप पाटील नागराळकर, सौ. स्वयंप्रभा पाटील, सौ. अनिता केंद्रे, संचालक अनुप शेळके, ज्ञानेश्वर सागावे, विजय टाकेकर, शरद देशमुख, पत्रकार शहाजी पवार, अरुण समुद्रे, राम जेवरे, हरी तुगावकर, संजय पाटील, दगडूआप्पा मिटकरी, शाम देशमुख, हरिराम कुलकर्णी, दयानंद बिडवे, रमेश जोशी, विनायक पाटील, शिवाजी कांबळे, अजय बोराडे, राजेसाहेब सवई, प्रवीण घोटाळे, राजेंद्र मस्के, कैलास कांबळे, चाँदपाशा इनामदार, रमेश थोरमोटे, ज्योती पवार, उषा कांबळे, उषा राठोड, नारायण लोखंडे, प्राचार्य गोविंद घार, भैरवनाथ सवासे, संजय पाटील खंडापूरकर, दयानंद बिडवे आदींनी आदरांजली वाहिली.

आदरणीय विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित असलेले विविध­ क्षेत्रांतील मान्यवर, संस्थांचे पदाधिकारी, काँग्रेस पक्ष व संलग्न संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक यांच्या मनात विलासराव देशमुख यांच्या भावपूर्ण आठवणी यावेळी दाटून आल्या. या प्रसंगी सुप्रसिद्ध संगीतकार पंडित शौनक अभिषेकी यांनी संतवाणी कार्यक्रम सादर केला. त्यांना संजय हिंगणे, पंकज शिरभाने, तुकाराम आव्हाड यांनी संगीत साथ दिली, तर संगीत संयोजन तालमणी डॉ. राम बोरगावकर यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळकृष्ण धायगुडे यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR