नवी दिल्ली : कुस्तीपटू विनेश फोगट ही ऑलिम्पिक स्पर्धेत अपात्र ठरली आहे. याच पार्श्वभूमीवर ‘विनेश तू चॅम्पियन आहेस’. असे ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वनेशचे सांत्वन केले आहे.
दरम्यान, विनेश अपात्र झाल्याने भारताला गोल्ड मेडल मिळवण्याचे स्वप्न भंगले आहे. त्यामुळे विनेश फोगाटसह संपूर्ण भारतीयांच्या पदरी निराशा पडली आहे. पण, तिने ऑलिम्पिकमध्ये केलेली कामगिरी चमकदार होती.
मोदी म्हणाले की, विनेश तू चॅम्पियन आहेत. तू देशाचा अभिमान आणि प्रत्येक देशवासियांसाठी प्रेरणादायी आहेस. आजचा सेटबॅक हा दु:खद आहे. माझे शब्द, माझ्या मनातील निराशा दाखवू शकणार नाहीत. पण, तू लढवय्यी आहेस, हार न मानणारी आहेस. आव्हानांचा स्वीकार करण्याचा तुझा स्वभाव आहे. तू पुन्हा अधिक ताकदीने पुढे ये. आम्ही सर्व तुझ्यासोबत आहोत.
मोदी यांचा पीटी उषा यांच्याशी चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आयओए अध्यक्ष पीटी उषा यांच्याशी चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. पीटी उषा यांच्याकडून या विषयावर आणि विनेशच्या अपात्रतेनंतर भारताकडे कोणते पर्याय आहेत याबद्दल प्राथमिक माहिती घेतली असल्याचे कळते. मोदींनी पीटी उषा यांना विनेशच्या केसमध्ये मदत करण्यासाठी कोणते पर्याय आहेत याची चाचपणी करण्यास सांगितले आहे. विनेशला मदत होणार असेल तर तिच्या अपात्रतेबद्दल तीव्र निषेध नोंदवावा असेही त्यांनी पीटी उषा यांना सांगितले आहे.