24 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeक्रीडाविनेशचे मायदेशात जल्लोषात स्वागत

विनेशचे मायदेशात जल्लोषात स्वागत

चाहत्­यांचे प्रेम पाहून अश्रू अनावर गावातले नागरिकही स्­वागतासाठी उत्­साहित

नवी दिल्ली : विनेश फोगाट ही पॅरिसहून भारतात परतली. विनेश भारतात येणार असल्­याने दिल्­ली एअरपोर्टवर विनेशच्या स्­वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. विनेशचे दिल्­ली एअरपोर्टवर आगमन झाल्­यावर तीच्या चाहत्­यांनी तिचे जोरदार स्­वागत केले. ढोल नगा-याच्या ठेक्­यावर चाहत्­यांनी नृत्­य करत तिचे जल्­लोषी स्­वागत केले. यावेळी आपल्­या चाहत्­यांचा उत्­साह पाहून विनेश भावूक झाल्­याचे दिसून आले. यावेळी तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहताना दिसून आले. दिल्­ली एअरपोर्टपासून गाव बलाली पर्यंत विनेशचे स्­वागत करण्यात येणार आहे. गावातले नागरिकही स्­वागतासाठी उत्­साहित असल्­याचे दिसून आले.

दिल्­ली एअरपोर्टवर विनेशचे कुस्­तीपटू साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी स्­वागत केले. विनेश चाहत्­यांच्या शुभेच्छा स्­वीकारत तिचे गाव बलालीला जाणार आहे. विनेशच्या घरी परतण्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील इंदिरा गांधी विमानतळावरून तिच्या गावी बलाली पर्यंत स्वागताची तयारी करण्यात आली आहे. विनेशचा भाऊ हरंिवदर म्हणाला विनेश देशात परतत आहे. दिल्ली विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी लोक आले आहेत. आमच्या गावातही लोक त्यांच्या स्वागताची वाट पाहत आहेत. विनेशला भेटून तिला प्रोत्साहन देण्यासाठी लोक उत्सुक आहेत.

विनेशची कुस्तीतून निवृत्ती
अपात्र ठरल्यानंतर विनेशने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली होती. मात्र, आता तीने निवृत्तीतून पुनरागमन करण्याचे संकेत दिले आहेत. विनेशने इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, कदाचित वेगवेगळ्या परिस्थितीत मी २०३२ पर्यंत स्वत:ला खेळताना पाहू शकेन, कारण संघर्ष आणि कुस्ती माझ्यामध्ये नेहमीच असेल. भविष्यात माझ्यासाठी काय असेल हे मी सांगू शकत नाही, पण मी या प्रवासाची वाट पाहत आहे. मला खात्री आहे की मी ज्या गोष्टींवर विश्वास ठेवते आणि जे योग्य आहे त्यासाठी मी नेहमीच लढत राहीन.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR