25.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeराष्ट्रीयइराणकडून भारतीय पर्यटकांना व्हिसा फ्री एन्ट्री

इराणकडून भारतीय पर्यटकांना व्हिसा फ्री एन्ट्री

नवी दिल्ली : आर्थिक अडचणीत सापडलेल्या इराणने भारतासोबत संबंध आणखी दृढ करताना व्हिसा फ्री एन्ट्री लागू केली आहे. त्यामुळे भारतीय पर्यटकांना इराणमध्ये व्हिसा फ्री एन्ट्री असेल. सांस्कृतिक देवाणघेवाण आणि पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या सरकारने ४ फेब्रुवारी २०२४ पासून भारतीय नागरिकांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री लागू केली आहे. यामध्ये नियम आणि अटींचाही समावेश करण्यात आला आहे.

इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या सरकारच्या मान्यतेनुसार ४ फेब्रुवारी २०२४ पासून खालील अटींच्या अधीन राहून भारतीय नागरिकांसाठी व्हिसा रद्द केला जाईल. सामान्य पासपोर्ट धारण केलेल्या व्यक्तींना दर सहा महिन्यांनी एकदा व्हिसाशिवाय देशात प्रवेश करण्याची परवानगी दिली जाईल, जास्तीत जास्त १५ दिवसांचा मुक्काम असेल. ५ दिवसांचा कालावधी वाढवता येणार नाही. व्हिसा रद्द करणे केवळ पर्यटनाच्या उद्देशाने इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या प्रदेशात प्रवेश करणा-या व्यक्तींना लागू होईल. जर भारतीय नागरिकांना दीर्घ कालावधीसाठी राहायचे असेल किंवा सहा महिन्यांच्या कालावधीत मल्टी एन्ट्री असतील किंवा इतर प्रकारच्या व्हिसाची आवश्यकता असेल तर त्यांनी भारतातील इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या संबंधित प्रतिनिधींद्वारे आवश्यक व्हिसा प्राप्त करणे आवश्यक आहे. या मंजुरीमध्ये नमूद केलेला व्हिसा रद्द करणे विशेषत: हवाई सीमेवरून देशात प्रवेश करणा-या भारतीय नागरिकांना लागू होते. डिसेंबर २०२३ मध्ये, इराणने ३३ देशांतील नागरिकांसाठी व्हिसा धोरणात बदल करण्याची घोषणा केली होती.

कुठे आहे व्हिसा फ्री एन्ट्री
अलीकडेच मलेशिया, श्रीलंका आणि व्हिएतनामने भारतातून येणा-या पर्यटकांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री धोरण लागू केले आहे. यापूर्वी, इराणमध्ये तुर्कीये, अझरबैजान प्रजासत्ताक, ओमान, चीन, आर्मेनिया, लेबनॉन आणि सीरिया येथील पर्यटकांना व्हिसा फ्री एन्ट्री होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR