मुंबई : ‘आम के आम, गुठलियों के दाम’, अशी हिंदीतील म्हण यंदाच्या आंब्याच्या सिझनमध्ये खरोखरच वास्तवात उतरली. आंब्याचा गर खाऊन राहिलेली कोय देखील आंब्या इतकीच मुल्यवान ठरली आहे. या कोयीपासून व्हिटामिन्स बी-12 हे पोषण मुल्य शोधून काढण्याचे काम एका तरुण महिला संशोधकाने केले आहे, जी एका पोलीस हवालदाराची कन्या आहे.
अल्फान्सो किंवा ज्याला आपण रत्नागिरीचा प्रसिध्द हापूस म्हणतो त्या आंब्याची कोय देखील तितकीच पौष्टीक आहे. या आंब्याच्या कोयीला ग्राईंडींग, क्रश्ािंग आणि फिल्टरींग आणि पाश्चरायजेशन केल्यानंतर संशोधकाना आंब्यांच्या कोयीपासून विटामिन्स बी -12 हे व्हीटामिन्स मिळाले. ज्यांना बी-12 ची कमतरता आहे. त्यांना रक्ताच्या पोषणासाठी हा खूपच उपयुक्त ठरणार आहे.
विशेष करुन शाकाहारी लोकांना आंब्याच्या कोयीपासूनचे तयार केलेले हे ज्यूस खूपच फायद्याचे ठरणार आहे. एका रिसर्च पेपरमुळे आंब्याच्या कोयीमधील बी-12 व्हिटामिन्सचा शोध लागला. गुजरात येथील शाकाहारी लोकांमध्ये बी-12 ची कमतरता असते. त्यामुळे गुजरात येथील वडोदरा, अहमदाबाद आणि सुरत या शहरातील बी-12 विटामिन्सच्या कमतरतेवर अभ्यास करताना त्यावर उपाय म्हणून आंब्याची कोय महत्वाची ठरली.
प्रोफेसर केळे आणि त्यांची विद्यार्थीनी असलेल्या प्रियंका देसाई यांनी आंब्याच्या कोयीचा अभ्यास सुरु केला. त्यांना त्यात बी-12 व्हिटामिन्स आढळले. त्यामुळे शाकाहारी लोकांमधील बी-12 व्हिटामिन्सची कमतरता भरुन काढणे शक्य होईल असे म्हटले जात आहे. संशोधकांना आंब्याची कोय गरम पाण्यात १२ तास भिजविली. तिची साल काढली. क्रश करुन त्यातील सॉलिड भाग फिल्टर केला, त्यानंतर ते लिक्विड पाश्चराईज्ड केले. त्यानंतर हे द्रावण ६३ डीग्री सेल्सिअसवर तीस मिनिटे ठेवले. नंतर ४ डीग्री सेल्सिअस पर्यंत थंड करुन पेट बॉटल्समध्ये पॅक केले.
त्यानंतर हे नमूने आणंद येथील नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डचे मुख्यालय आणि नवी मुंबईतील ऑटोकल सोल्युशन प्रा. लि. अशा दोन मान्यताप्राप्त लॅबोरेटरीमध्ये तपासणीसाठी पाठविले. त्यात १०० मिलीमीटर ज्यूसमध्ये १० मायक्रोग्रॅम व्हिटामिन्स सापडले. हे बी-12 ची कमतरता असलेल्या वयस्कांना द्यावा लागणा-या २.४ मायक्रोग्रॅम व्हिटामिन्सहून हे अधिक असल्याचे केळे यांनी सांगितले.
पोलीस हवालदाराच्या कन्येची कमाल
रक्ताचे आरोग्य राखण्यासाठी आणि रक्तप्रवाहात व्हिटॅमिन बी-12 ची पातळी सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या व्हिटॅमिन बी-12 साठी आहार भत्ता निर्धारित केला जातो असे केळे यांनी सांगितले. इतकेच काय, आर्थिक सहाय्याचा लाभ घेण्यासाठी गुजरात टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या इनोव्हेशन अँड स्टार्टअप सेंटरमधील स्टुडंट स्टार्टअप अँड इनोव्हेशन पॉलिसीच्या तज्ञांच्या छाननी समितीने देखील या प्रकल्पाची निवड केली असल्याचे केळे यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पातील संशोधक विद्यार्थीनी मुंबईतील पोलीस हवालदार विलास देसाई यांची कन्या असलेली प्रियंका देसाई (टीना) हिने आंब्याच्या कोयीपासून बी-12 विटामिन तयार केले आणि त्याचे पेटंट मिळविले आहे. मुळची कुर्ला नेहरु नगर येथील राहणा-या प्रियंका हीने वयाच्या २४ व्या वर्षी हा मान पटकावला आहे. कोयी पासूनचा ज्यूस विविध फ्लेवरमध्ये तयार होणार आहे.