25.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeराष्ट्रीयप. बंगालची घटना अत्यंत वेदनादायी

प. बंगालची घटना अत्यंत वेदनादायी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कोलकाता येथील घटना वेदनादायक आणि भयावह आहे. बस्स. आता खूप झाले. ज्यावेळी कोलकाता येथे विद्यार्थी, डॉक्टर आणि नागरिक आंदोलन करत होते, तेव्हा या प्रकरणातील आरोपी खुलेआम फिरत होते, असे स्पष्ट करीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.

देशात महिलांवर होणा-या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी कोलकाता येथील डॉक्टर तरुणीवर बलात्कार करत तिची हत्या करण्यात आली होती. तसेच बदलापूर येथे दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराचे प्रकरण पुढे आले होते. याशिवाय इतरही राज्यातून अशाच प्रकारच्या घटना पुढे आल्या आहेत. या घटनांनंतर नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले आहे. यावरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. यावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही नाराजी व्यक्त केली.

कोणताही सुसंस्कृत समाज मुलींवर अशाप्रकारे अत्याचार होऊ देऊ शकत नाही. समाजाला आता प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. समाजाची दयनीय मानसिकता महिलांना कमी लेखते. १२ वर्षांपूर्वी झालेल्या निर्भया प्रकरणानंतर अशा ब-याच घटना घडल्या आहेत. मात्र, समाजाने याकडे दुर्लक्ष केले. आपल्या समाजाला सामूहिक स्मृतिभ्रंशाचा त्रास झाल्याचे दिसून येते, या संकटाचा आपण सर्वांनी मिळून सामना केला पाहिजे, असेही राष्ट्रपती म्हणाल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR