26.4 C
Latur
Tuesday, February 25, 2025
Homeपरभणीचिखलमय रस्त्यामुळे वाघाळा, फुलारवाडी नागरिकांचे हाल

चिखलमय रस्त्यामुळे वाघाळा, फुलारवाडी नागरिकांचे हाल

पाथरी : तालुक्यातील वाघाळा-फुलारवाडी या साडेतीन किमी अंतराच्या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. पाणी आणि चिखलय रस्त्यावरून चालताना विद्यार्थी, नागरीकांसह आजारी व्यक्तींना तारेवरची कसरत करावी लागते. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी पक्का रस्ता करण्याच्या आश्वासनावर बोळवण केली जात असल्याचे वाघाळा ग्रामस्थ सांगत आहेत.

वाघाळा, फुलारवाडी या रस्त्याची पाणी आणि चिखलमय अवस्था झाली आहे. याच रस्त्याने फुलारवाडी आणि आदिवासी पारधी वस्तीवरील शाळाकरी मुले वाघाळा येथे प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत शिक्षण घेण्यासाठी मोठी कसरत करत येत असतात. या सोबतच येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि तालुका, जिल्हा कचेरीची कामे करण्यासाठी जाणा-या नागरीकांना याच चिखल, पाण्यातून वाट काढत पाई प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात या रस्त्याची दयनीय अवस्था होत असल्याने अनेक आजारी रुग्ण दवाखाण्यात पोहचण्या आधिच दगावल्याच्या घटना या आगोदर मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत.

आदिवासी, पारधी वस्ती वरील अनेक गर्भवती महिलांची प्रसुती रस्त्यात झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. दरवेळी निवडणुका आल्या लोकप्रतिनिधी पक्का डांबरी रस्ता तयार करून देण्याचे नवे आश्वासन देतात. निवडणुका पार पडल्यानंतर पुन्हा पाच वर्ष फिरकतही नाहीत. या आश्वासनांची पुर्तता होत नसल्याने गत वेळी फुलारवाडी ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. या वेळी ही आश्वासनावर बोळवन करत नेत्यांनी वेळ मारून नेली होती. त्यामुळे या दोन्ही गावच्या ग्रामस्थांमधून रस्त्याच्या दुरावस्थेमुळे तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR