27.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeराष्ट्रीय‘अ‍ॅपल’ युजर्सचे डिटेल लिक होण्याचा इशारा

‘अ‍ॅपल’ युजर्सचे डिटेल लिक होण्याचा इशारा

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या सिक्योरिटी अ‍ॅडव्हायजर, इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने अ‍ॅपलबाबत एक अ‍ॅडव्हायझरी जारी केली असून ही परिस्थिती गंभीर असल्याचं म्हटलं आहे. सीईआरटीच्या अ‍ॅडव्हायझरीनुसार, ‘अ‍ॅपल’ उत्पादनांमध्ये अनेक त्रुटी आढळल्या आहेत ज्यामुळे अटॅकर्स संवेदनशील माहितीपर्यंत पोहचू शकतात.

सीईआरटीचे म्हणणं आहे की, हॅकर्स फोनमधील महत्त्वाची माहिती लीक करू शकतात. यासह सिक्योरिटी बॅरियर्स पार करणे, सर्व्हिस डिनाय करणं आणि सिस्टमवर स्पूफिंग अटॅकना देखील परवानगी दिली जाऊ शकते.

यापूर्वी, अ‍ॅपलने गेल्या आठवड्यातच आपले लेटेस्ट सिक्योरिटी अपडेट्स शेअर केले होते आणि लेटेस्ट व्हर्जन ऑफिशियल पोर्टलवर अपलोड केलं आहे, जे सर्व युजर्स वाचू शकतात. आता ‘सीईआरटी-इन’ ने सर्व युजर्सना अ‍ॅपलद्वारे अपलोड केलेल्या आवश्यक सॉफ्टवेअरचे अपडेट लागू करण्यास सांगितलं आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR