पाटणा : विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची मंगळवारी (१९ डिसेंबर ) रोजी दिल्लीत बैठक होणार आहेत.
या बैठकीत बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव, काँग्रेस नेते राहुल गांधी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आघाडीचे इतर प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. दरम्यान, लालू प्रसाद यादव यांनी सोमवारी दावा केला आहे की, इंडिया आघाडीतील सर्व सदस्य पक्ष आगामी लोकसभा निवडणूक एकत्र लढवतील आणि सत्ताधारी भाजपाला सत्तेवरून हटविणार आहोत. आम्ही बैठकीला जात आहोत. सर्वांना (निवडणूक) एकत्र लढवायची आहे, असे म्हणाले.
एका पत्रकाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ‘मोदींची हमी’ याविषयी प्रश्न विचारला असता लालू यादव म्हणाले की, रोज आपण एकच विचारता, नरेंद्र मोदी म्हणजे काय आहेत? असे ते म्हणाले. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर आघाडीची ही पहिलीच बैठक आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने चांगली कामगिरी केली. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये बहुमत मिळवून भाजपने सरकार स्थापन केले. या निवडणूक निकालांना काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात होता. केवळ तेलंगणात काँग्रेस चांगली कामगिरी करू शकली.