20.9 C
Latur
Friday, January 24, 2025
Homeसोलापूररिटेवाडी वाडी उपसा सिंचन योजना बाबत पंधरा दिवसात माहिती घेऊ

रिटेवाडी वाडी उपसा सिंचन योजना बाबत पंधरा दिवसात माहिती घेऊ

करमाळा प्रतिनिधी
सोलापूर पासून करमाळा तालुका 135 किलोमीटर अंतरावर असून या ठिकाणी जिल्हा पातळीवर कोणतेच अधिकारी आढावा बैठक किंवा तक्रारी ऐकून घेण्यासाठी येत नाहीत तालुक्यातील हे प्रश्न सोडवण्यासाठी करमाळा तालुक्यात पालकमंत्री चंद्रकांत दादांनी आढावा बैठक घ्यावी रीटेवाडी उपसा सिंचन योजनेचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा नियोजन मंडळाचे सदस्य महेश चिवटे यांनी सभागृहात केली.

यावेळी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी करमाळा तालुक्यामध्ये बैठक घेण्याचे आश्वासन देऊन रिटेवाडी उपसा सिंचन बाबतीत पंधरा दिवसात सविस्तर सखोल माहिती अधिकाऱ्यांकडून घेऊ असे आश्वासन दिले. कुकडी प्रफुल प्रकल्पासाठी अकराशे कोटी रुपये खर्च करून सर्व तालुक्यात कॅनल खोदण्यात आले आहेत या कॅनलमध्ये उजनीतून पाणी टाकण्यासाठी रिटेवाडी उपसा सिंचन योजनेसाठी केवळ शंभर कोटी रुपयांची आवश्यकता असून ही योजना पूर्ण झाली तालुक्यातील 50 हजार क्षेत्रवलीता खाली येऊन दीड लाख नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे.

याबाबत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती.जलसंपदा विभागाने ही योजना सकारात्मक असल्याचा अहवाल दिला आहे.ही बाब चीवटे यांनी सभागहाच्या निदर्शनास आणून दीली. करमाळ्यातील रुग्णसेवा गोरगरिबांसाठी सुरू केलेले आपला दवाखान्यात योजना डॉक्टर अभावी बंद असल्याचे निदर्शनास आणून दिले. उजनी धरण व मांगीतलावरील शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडू नये चालू वर्षाचा दुष्काळ निधी व पिक विमा अशी मिळून 200 कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांची शासनाकडून येणे असून या रकमेचे वाटप तात्काळ सुरू करावे.करमाळा शहराची हद्द वाढून शहराबाहेर झालेली विकसित कामे व निवासी घरे नगरपालिके हद्दीत घ्यावी. नगरपालिकेतील प्रलंबित 284 घरकुलांना तात्काळ मान्यता द्यावी.करमाळा एस टी महामंडळ आगारासाठीक नवीन पन्नास बसेस द्याव्या.

जेऊर येथे स्वतंत्र तालुका पोलीस स्टेशन करावे कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी पणन महामंडळाकडून शेतकरी सुविधांसाठी पन्नास लाखाचा निधी द्यावा. करमाळा नगरपालिकेसाठी भुयारी गटार योजना केंद्रीय अमृत जलवाहिनी योजनेतून नवीन पाणीपुरवठा योजना आणि जलशुद्धीकरण केंद्र यासाठी तांत्रिक मंजुरीसाठी रखडलेली दीडशे कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी द्यावी .शहरातील रंभापुरा येथे छत्रपती संभाजी राजे उद्यानासाठी व स्मारक उभा करण्यासाठी पन्नास लाखाचा निधी द्यावा करंजे आलेश्वर रस्त्यावरील सीना नदीवरील पू लासाठी जलसंपदा विभागाकडून मान्यता द्यावी.आदी मागण्याची निवेदन दिली.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR