22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeउद्योगअर्थसंकल्पात अतिथि देवो भव!

अर्थसंकल्पात अतिथि देवो भव!

हजारो वर्षांपूर्वीचे विद्यापीठ बनविणार पर्यटन केंद्र

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या तिस-या कार्यकाळातील हा पहिला अर्थसंकल्प आणि अर्थमंत्री सीतारमण यांचा सलग सातवा अर्थसंकल्प असून पर्यटन क्षेत्राबाबत मोठी घोषणा केली आहे.

अर्थसंकल्पामध्ये सीतारमण यांनी बिहारमधील नालंदाला पर्यटन केंद्र म्हणून विकसित करणार अशी घोषणा केली आहे. तसेच राजगीरमध्ये अनेक विमानतळ, वैद्यकीय महाविद्यालय, स्टेडियम, औद्योगिक केंद्र, महाबोधी कॉरिडॉर, पर्यटन सुविधांच्या विकासाची घोषणाही केली. नालंदा आणि राजगीरला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी केंद्र सरकारही मदत करेल अशी महत्वाची घोषणा केली आहे. तसेच केंद्र सरकार बिहारमध्ये अनेक विमानतळ, वैद्यकीय महाविद्यालये आणि क्रीडा पायाभूत सुविधा उभारणार आहे. यासाठी निधी देखील जाहीर केला आहे.

दरम्यान भाषणात अर्थमंत्री म्हणाल्या पर्यटन हा नेहमीच आपल्या सभ्यतेचा भाग राहिला आहे. भारताला जागतिक पर्यटन स्थळ बनवण्याचे आमचे प्रयत्न नवीन रोजगार निर्माण करतील आणि इतर क्षेत्रातही नवीन संधी निर्माण करतील. बिहारमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ राजगीर येथील गरम पाण्याचे झरे जतन करण्याचे काम केले जाईल असेही अर्थमंर्त्यांनी सांगितले. याशिवाय देशातील इतर ठिकाणी धार्मिक पर्यटनाला जोडून विकास कामे करण्यात आली असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.

ओडिसाला विकसीत करणार
तसेच अर्थमंत्री सीतारमण यांनी ओडिसाला पर्यटनासाठी विकसित करण्याची घोषणा केली. कारण ओडिसामध्ये निसर्ग सौंदर्य खुप आहे. त्यामुळे ओडिसाला पर्यटन स्थळ म्हणून विकसित केले जाणार आहे. ओडिसामधील नैसर्गिक सौंदर्य, मंदिरे, स्मारके, वन्यजीव अभयारण्य, सुंदर सुमद्रकिनारे यामुळे ओडिशाच्या पर्यटनाला चालना मिळेल. त्याच्या विकासाठी केंद्र सरकार मदत करेल. यामुळे पर्यटनाला चालना मिळेल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठा हातभार लाभेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR