24.1 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रही कायद्याची मोडतोड नव्हे तर काय?

ही कायद्याची मोडतोड नव्हे तर काय?

मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यास केंद्रीय कर्मचा-यांनी मनाई करणारा आदेश मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे आता हे कर्मचारीही संघाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतात.

गेली ५८ वर्षे केंद्रीय कर्मचा-यांवर ही बंदी घालण्यात आली होती. यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना, ही कायद्याची मोडतोड नव्हे तर, काय आहे? असा प्रश्न केला आहे.

केंद्र सरकारने आरएसएसच्या कार्यक्रमांमध्ये केंद्रीय कर्मचा-यांच्या सहभागावरील ५८ वर्षे जुनी बंदी उठवली आहे. या नव्या आदेशाच्या माध्यमातून १९६६, १९७० आणि १९८० च्या सरकारी आदेशांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

ही कायद्याची मोडतोड नव्हे तर काय आहे? असा प्रश्न त्यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. सरकारी अधिकारी-कर्मचा-यांना आरएसएसच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची परवानगी देण्यासाठी चक्क सरकारी परिपत्रक काढता? भारतीय संविधान पूर्णत: मोडीतच काढायचे हे ठरवले आहे का? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR