अकोला : प्रतिनिधी
शेतक-यांनी नुकसान झाल्याचं सांगितल्याशिवाय अनावश्यक पंचनामे करण्याची गरज काय?, असं काहीसा वादग्रस्त सवाल राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केला. ते अकोला येथे कृषी विद्यापीठाच्या तीन दिवसीय कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. दरम्यान, कृषी विद्यापीठातील स्टॉल धारकांना विद्यापीठाने शुल्क आकारण्याच्या प्रश्नावरही त्यांनी वादग्रस्त उत्तर दिलंय.
लोकसहभागातूनच कोणतेही काम पूर्णत्वास जाते. सरकारने फुकट दिले तर मग काहीच काम करायचं नाही का?, असा सवाल त्यांनी केलाय. आज अकोल्याच्या कृषी विद्यापीठातील कृषी प्रदर्शन उद्घाटनाचा कार्यक्रम माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे रद्द करण्यात आलाय. यावेळी कृषीमंर्त्यांनी मनमोहनसिंग यांना श्रद्धांजली वाहिलीय.