17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्र‘जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय’

‘जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय’

बारामतीत प्रतिभा पवार यांचा जंगी प्रचार

बारामती : आजपासून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभा बंद होणार आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबर दिवशी मतमोजणी होणार आहे. आज बारामतीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचाराची सांगता सभा झाली. या सभेतील एका बॅनरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

बारामती येथील सांगता सभेत कार्यकर्त्यांनी खासदार शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना एक बॅनर दिले. या बॅनरवरील मजकूराची जोरदार चर्चा सुरू आहे. या बॅनरवर जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय’ असा मजकूर आहे. हा मजकूर खासदार शरद पवार यांच्याबाबत आहे. युगेंद्र पवार यांच्यासाठी आज बारामतीमध्ये सर्व पवार कुटुंबीय एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. सांगता सभेत प्रतिभा पवार यांनी सर्वांच विशेष लक्ष वेधून घेतले.

प्रतिभा पवार यांना कार्यकर्त्यांनी एक फलक दिला. हा फलक घेऊन पवार यांनी कार्यकर्त्यांसोबत फोटो काढले. या फलकावर ‘जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय’ असं लिहिले आहे. या फलकाने सभेत सर्वांच लक्ष वेधून घेतले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होत आहेत. दरम्यान, आता विधानसभा निवडणुकीत राज्यभरात अनेक ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढत दिसत आहे.

बारामती विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात त्यांचेच पुतणे युगेंद्र पवार निवडणूक लढवत आहेत. यामुळे या मतदारसंघावर देशाचे लक्ष लागले आहे. खासदार शरद पवार यांनी या मतदारसंघात जारदार प्रचार केला आहे तर अजित पवार यांनीही गांवांना भेटी देत प्रचार केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR