मुंबई : वाशी रेल्वे स्टेशनवर रुळ ओालांडताना गाडीखाली आलेल्या प्रवाशाचा अखेर मृत्यू झाला आहे. प्लॅटफॉर्मवरील सर्व प्रवाशांनी त्यांना गाडीखालून काढले होते. पण जखमी झालेल्या प्रवाशाचा अखेर मृत्यू झाला. राजेंद्र खाडके असे या मृत प्रवाशाचे नाव आहे.
वाशी रेल्वे स्टेशनवर रेल्वे रूळ ओलांडताना राजेंद्र खाडके नावाचे प्रवासी गाडी खाली आले. खाडके हे काही काळ गाडीखाली अडकले होते. त्यांना वाचवण्यासाठी प्लॅटफॉर्मवरच्या आणि गाडीतल्या प्रवाशांनी एकत्र येत चक्क सर्वशक्तिनिशी गाडीचा डबा हलवला होता. प्रवाशांच्या या समूहशक्तीतून त्यांना डब्याखालून बाहेर काढण्यात यश आले. मात्र राजेंद्र खाडके गंभीर जखमी झाले होते. अखेर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.