21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रविधानसभेत मुस्लिमांचा कौल कुणाला?

विधानसभेत मुस्लिमांचा कौल कुणाला?

आकडेवारीचा अंदाज आला समोर

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला बहुमत मिळाले. यात मुस्लिम समाजाने लोकसभेला महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केल्याचे सांगितले जाते, आकडेवारी मांडली जात आहे. आता विधानसभा निवडणुकीला मुस्लिम समाजाचे मतदान नेमके कोणाच्या बाजूने याची आकडेवारी समोर आली आहे.

दरम्यान,भाजप महायुतीला २३७ जागा मिळाल्या. महायुती देखील एवढ्या मोठ्या यशाने भारावून गेली आहे. त्यामुळे कोणत्या समाजाने कोणाच्या पारड्यात किती मते टाकली, याची आकडेवारी मांडली जात आहे. राज्यातील ३८ विधानसभा मतदारसंघांत मुस्लिम लोकसंख्या २० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. या मतदारसंघांपैकी २२ ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीला अवघ्या १३ जागांवर विजय मिळाला आहे. तर अन्य तीन जागांवर इतर उमेदवारांनी विजय मिळवला आहे.

मुस्लिम मतदारांच्या मतांत यंदाच्या निवडणुकीत फाटाफूट झाल्याचे दिसते. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसरे ११ जागा जिंकल्वा होत्या. यावेळी पाचच जागा जिंकल्या. शिवसेना उबाठाला सहा, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला दोन जागा मिळाल्या आहेत.

राज्यात सर्वाधिक जागा भाजपने जिंकल्या आहेत. मुस्लिम लोकसंख्या जास्त असलेल्या ३८ मतदारसंघांत भाजपने आपल्या कामगिरीत चांगलीच सुधारणा केली आहे. गेल्या निवडणुकीत ११ जागा जिंकणा-या भाजपने यंदा १४ जागा जिंकल्या आहेत.

शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने सहा, तर अजित पवार यांनी दोन जागा जिंकल्या आहेत. समाजवादी पक्षाने दोन, तर एमआयएमने एक जागा जिंकली आहे. झिशान सिद्दिकी, नवाब मलिक आणि नसीम खान हे दिग्गज मुस्लिम नेते या निवडणुकीत पराभूत झाले आहेत.

जलील यांचा पराभव मतविभागणीमुळे
एकापेक्षा जास्त मुस्लिम उमेदवार असल्याचा फटका महाविकास आघाडीला बसला आहे. यातून महायुतीचा विजय सोपा झाला. छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघात एमआयएमचे इम्तियाज जलील यांचा पराभव मतविभागणीमुळे झाला. वंचितचे अफसर खान आणि समाजवादी पक्षाचे अब्दुल गफार सय्यद या मुस्लिम उमेदवारांनी इम्तियाज जलील यांच्या पराभवात निर्णायक भूमिका बजावली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR