21.5 C
Latur
Saturday, January 11, 2025
Homeमहाराष्ट्रज्याचा राजा व्यापारी, त्याची जनता भिकारी : गडकरी

ज्याचा राजा व्यापारी, त्याची जनता भिकारी : गडकरी

मुंबई : देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे रस्ते विकासासोबतच त्यांच्या उघडपणे बोलण्याच्या शैलीमुळे चांगलेच चर्चेत असतात. त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, ज्याचा राजा व्यापारी, त्याची जनता भिकारी. आज दुर्दैवाने ना उजवे, ना डावे अशी स्थिती आहे. ‘आपण संधीसाधू’ हेच राजकारणातले सूत्र असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी गटबदलू राजकारण्यांवर टीका केली. कोण कुठल्या पक्षात कधी घुसतात?, कधी बाहेर जातात?, कुठे जातात? हे कोणालाच सांगता येत नाही. देशात विचारभिन्नतेपेक्षा विचारशून्यता ही सगळ्याच क्षेत्रातली समस्या असल्याचे गडकरी यावेळी म्हणाले.

केंद्रीय रस्ते, वाहतूक विभागात मी सर्व बाबतीत पब्लिक-प्रायव्हेट गुंतवणुकीला प्रोतासहन दिले. आधी सरकारनेच सगळे करायचे होते. पण मी नेहमी म्हणतो, ज्याचा राजा व्यापारी, त्याची जनता भिकारी. सरकार म्हणजे विषकन्या आहे. कोणत्याही पक्षाचे सरकार असू देत. ज्या कामाला हात लावतात, ९९ टक्के कामे, अगदी सोन्याच्या खाणीही तोट्यात आणतात. पण पब्लिक-प्रायव्हेट व्यवस्थेने विकासाचा दर वाढतो, नफा वाढतो, रोजगार निर्माण होतो, गरिबी कमी होते, असे विधान नितीन गडकरींनी केले.

तसेच मुंबई-गोवा महामार्गावर जमीन अधिग्रहणाची मोठी समस्या आहे. त्यामुळे या कामाला उशीर होत गेला. पण आता बऱ्यापैकी समस्या सुटल्या असून पुढील ६ महिन्यात हा महामार्ग पूर्ण होईल अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR