28.9 C
Latur
Tuesday, April 1, 2025
Homeमहाराष्ट्रखून का बदला खून...मुलाच्या मारेक-याला बापाने संपविले

खून का बदला खून…मुलाच्या मारेक-याला बापाने संपविले

आर्णी येथील हत्याकांड

यवतमाळ : आर्णी शहरात २ वर्षांपूर्वी दुर्गा विसर्जन मिरवणुकीत क्षुल्लक कारणावरून दोघांनी युवकाचा खून केला. या घटनेनंतर मुलाला गमावलेल्या बापाच्या मनात सुडाचा अग्नी पेटत होता. मुलाचा मारेकरी न्यायालयाच्या तारखेसाठी आर्णी शहरात आल्याची माहिती मिळताच त्याने पाठलाग सुरू केला. संधी मिळाल्यानंतर शहरातील एका शाळेसमोर तलवारीने हल्ला करून मुलाच्या मारेक-याला ठार केले. हा थरार शनिवारी सायंकाळी ७ वाजता घडला.

ओम गजानन बुटले (२५) असे मृताचे नाव आहे. ओमने दोन वर्षांपूर्वी दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत वाद घालून अजय अवधूत तिगलवाड (२२, रा. कोळवन) या युवकाचा खून केला होता. त्यानंतर ओम जामिनावर बाहेर आला होता. मुलाचा कुठलेही कारण नसताना हकनाक बळी घेतला. याची खंत अजयचे वडील अवधूत सूर्यभान तिगलवाड (५०) यांना होती. मुलाच्या मारेक-याला सोडायचे नाही, या मानसिकतेतून अवधूत ओमच्या हालचालींवर लक्ष ठेवून होता. शुक्रवारी ओमची न्यायालयात तारीख असल्याने तो आर्णी शहरात आला होता.

पुणे येथे जाण्याच्या बेतात असतानाच हल्ला
शनिवारी सायंकाळी तो पुणे येथे जाण्यासाठी सनराईज शाळेसमोर उभा होता. याच संधीचा फायदा घेऊन अवधूत तिगलवाड याने ओमवर तलवारीने वार केले. ओम जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याला गंभीर अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून यवतमाळ येथे हलविण्यात आले. प्रवासादरम्यानच ओमचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी काही तासांतच अवधूत तिगलवाड याला अटक केली. वृत्त लिहिस्तोवर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला नव्हता. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी रजनिकांत चिलुमुला, आर्णी ठाणेदार सुनील नाईक यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणात इतरही तिघांना संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR