23.3 C
Latur
Sunday, July 14, 2024
Homeमहाराष्ट्रशिंदे-फडणवीस का नव्हते? अजित पवारांची स्पष्टोक्ती

शिंदे-फडणवीस का नव्हते? अजित पवारांची स्पष्टोक्ती

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या अगदी जवळची व्यक्ती अमोल काळे, यांचे निधन झाले आहे. त्यांच्या अस्तीविसर्जनासाठी त्यांना (देवेंद्र फडणवीस) नाशिकला जायचे होते. ते गेले दोन-तीन दिवस त्या दु:खात आहेत. याशिवाय, एकनाथ शिंदे यांना मी आदल्या दिवशी रात्रीच वर्षावर भेटलेलो होतो. त्यांना सांगितले की, आज रात्रीपर्यंत किंवा उद्यापर्यंत आमच्या उमेदवाराचे नाव ठरेल. आम्ही सर्वजण जाऊन तो फॉर्म भरणार आहोत.

सर्वांनीच तो फॉर्म भरायला जायला हवे, असे काही मला वाटत नाही. ते म्हणाले हरकत नाही. महायुती तर बरोबर आहेच. त्यामुळे तुम्ही जाऊन फॉर्म भरला. तरी देखील बातम्या लावल्या. अरे… राष्ट्रवादीच होती… शिवसेना शिंदे गट नव्हता… भाजप नव्हता… मी जर त्यांना बोलावलेलेच नव्हते, जर एक घटना घडलेली असताना, ते दु:खात असताना, आपण चला-चला फॉर्म भरायला चला, असे म्हणणे मला योग्य वाटले नाही आणि निवडणूकही बिनविरोध होणार होती. कारण एकीकडे २०० मते होती आणि एकीकडे काही ७०-७५ मते होती. त्यामुळे आम्ही आपले गेलो असल्याचा खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी गुरुवारी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राँष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे आणि छगन भुजबळ उपस्थित होते. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित नव्हते. महायुतीतील हे दोन बडे नेते उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले होते. मात्र, त्यावेळी हे दोन नेते का उपस्थित नव्हते? यासंदर्भात खुद्द अजित पवार यांनीच खुलासा केला आहे. याशिवाय त्यांनी, छगन भुजबळ यांच्या नाराजीवरही भाष्य केले आहे.

आमचे प्रमुख नेते फॉर्म भरताना प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनिल तटकरे आणि नरहरी झिरवाळ होते. कारण चार जणांनाच आत प्रवेश असतो. आता स्क्रुटिनीमध्ये अर्ज मंजूर झालेला आहे. आता माघार घेण्याची वेळ आहे. त्यावेळेत जर उमेदवाराने माघार घेतली नाही, तर त्या बिनविरोध आल्या असे समजायला हरकत नाही असेही अजित पवार म्हणाले. छगन भुजबळ यांच्यासंदर्भात बोलताना अजित दादा म्हणाले, भुजबळ नाराज आहेत, हे धादांत खोटे आहे. स्वत:भुजबळांनी सांगितले की, मी नाराज नाही. प्रफुल्ल भाईंनी सांगितले, तटकरेंनी सांगितले, तरी देखील काही लोक, मग आमचे विरोधक असतील किंवा आमचे फारच जवळचे मित्र असतील, जे आमचा फारच विचार करतात. त्यांनी अशा बातम्या पिकवल्या आहेत. त्या बातम्यांमध्ये तसूभरही तथ्य नाही. यासंदर्भातला (सुनेत्रा पवार यांचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज) निर्णय पार्लमेंटरी बोर्डाने घेतला आहे आणि काल फॉर्म भरला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR