मुंबई : विशेष प्रतिनिधी
अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी बरेच जण इच्छुक आहेत. यामध्ये कलाकारही कुठे मागे नसल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच सयाजी श्ािंदे यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता प्रसिद्ध गायक आनंद श्ािंदे यांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेतली असल्याची माहिती समोर आलेली आहे.
आनंद शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतली असून आनंद शिंदे त्यांचा मुलगा उत्कर्ष श्ािंदेच्या उमेदवारीसाठी आग्रही असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. त्याचप्रमाणे आनंद शिंदे यांनी मोहोळ, शिर्डी किंवा दक्षिण सोलापुरमध्ये उमेदवारीसाठी आग्रही भूमिका घेतली असल्याची माहिती सध्या समोर आली आहे. त्यामुळे आता श्ािंदे घराणे जर राजकारणाच्या वर्तुळात आले तर निवडणुकीच्या रिंगणात स्वत: आनंद शिंदे उतरणार की उत्कर्षसाठी आग्रह धरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
दरम्यान आनंद शिंदे आग्रही असलेल्या मतदारसंघामध्ये शरद पवारांची ताकद आहे. त्यामुळे मोहोळ, शिर्डी आणि दक्षिण सोलापूर या मतदारसंघातून आनंद शिंदे हे विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे म्हटले जात आहे. यावर आता शरद पवार काय भूमिका घेणार हे पाहणेही महत्त्वाचं ठरेल.